नार्को टेस्टला सामोरे जाण्यास कुस्तीपटू तयार, बृजभूषण यांचे आव्हान स्वीकारले | पुढारी

नार्को टेस्टला सामोरे जाण्यास कुस्तीपटू तयार, बृजभूषण यांचे आव्हान स्वीकारले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लैंगिक छळवणुकीच्या आरोपासंदर्भात आपण नार्को आणि लाय डिटेक्टर चाचणीला सामोरे जाण्यास तयार आहोत, पण कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचीही अशीच चाचणी झाली पाहिजे, असे आव्हान भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांनी दिले होते. हे आव्हान स्वीकारत कुस्तीपटूंनी चाचणीस तयारी दर्शवली आहे.
आम्ही आमचे निर्दोषत्व सिद्ध करण्यास तयार आहोत, पण जी काही चाचणी होईल, ती सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील व्हावी आणि तिचे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर जिवंत प्रसारण व्हावे, असे बजरंग पुनिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चाचणीत कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार, हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर धरणे आंदोलन चालविलेले आहे.
हेही वाचा

Back to top button