Worldwide Holi festival : या देशातही होळी खेळतात पण…उत्सव आणि परंपरा वेगवेगळ्या | पुढारी

Worldwide Holi festival : या देशातही होळी खेळतात पण...उत्सव आणि परंपरा वेगवेगळ्या

पुढारी ऑनलाइन डेस्क : Worldwide Holi festival : होळी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा सण उत्सव आहे. भारतातील होळीला रंग खेळण्याची परंपरा जगभर प्रसिद्ध आहे. होळीच्या दुस-या दिवसापासून रंग खेळण्याची परंपरा आहे. त्याला धुलंडी किंवा धुलीवंदन असेही म्हटले जाते. रंगपंचमीपर्यंत भारतात रंग खेळला जातो. रंगाच्या पाण्याने भरलेली पिचकारी एकमेकांच्या अंगावर मारण्याचा मनमुराद आनंद येथे लुटला जातो. तर उत्तरप्रदेशची लठमार होली. बायका आपल्या नव-यांना काठीने मारतात आणि पुरुष ढाल घेऊन स्वतःचा बचाव करतात अशी होळी देखील खूप प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का होळी साजरी करणारा भारत हा एकमेव देश नाही तर जगातील अन्य देशांमध्येही होळीसारख्याच सण आणि परंपरा आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या देशात काय परंपरा आहे.

Worldwide Holi festival : रोममधील होळी सण

रोममध्ये होळी सण जवळपास भारतातील होलिका दहन सारखाच असतो. रोमन लोक या सणाला रेडिका म्हणतात. या दिवशी लोक शहरातील सर्वात उंच स्थानावर जाऊन लाकडे गोळा करून त्यांना जाळतात या दहनावेळी रोमन लोक याच्या आजूबाजूला नाचतात, गाणी गातात आणि मस्ती करतात.

स्पेनची होळी

जिंदगी ना मिलेगी दुबारा या चित्रपटात तुम्ही स्पेन या सुंदर देशाला पाहिलेच असतील. तिथेही होळी खेळतात. पण रंगांनी नाही तर टमाट्यांनी! या उत्सवाला टोमाटीना असे नाव आहे. या दिवशी लोक रंगांऐवजी एकमेकांवर टमाटे फेकून किंवा टमाट्याच्या चिखलात एकमेकांना टाकून आनंद साजरा करतात.

Worldwide Holi festival : ऑस्ट्रेलियाची होळी

ऑस्ट्रेलिया या देशात देखील होळी सारखाच सण साजरा केला जातो. पण इथेही स्पेन प्रमाणेच रंगाने नाही तर एका फळाने होळी खेळली जाते. त्याचे नाव आहे कलिंगड. हा सण फेब्रुवारीतच साजरा केला जातो. याचे नाव आहे वॉटरमेलन फेस्टिवल. स्पेनमध्ये जसे लोक एकमेकांवर टोमॅटो फेकतात तसेच या फेस्टिव्हलमध्ये लोक एकमेकांवर कलिंगड म्हणजेच वॉटरमेलन फेकून याचा आनंद उचलतात.

दक्षिण कोरियाची होळी

कोरियातील परंपरा आणि संस्कृती भारतातील होळीशी साधर्म्य दाखवतात. भारताप्रमाणेच दक्षिण कोरियातही रंगांचा सण साजरा केला जातो. इथे याला बोरयॉन्ग मड फेस्टिवल म्हटले जाते. दक्षिण कोरियात हा मड फेस्टिवल जुलाईमध्ये साजरा केला जातो. फेस्टिवल दरम्यान लोक एकमेकांवर चिखल फेकतात. एका मोठ्या टबमध्ये चिखल भरलेला असतो. यामध्ये लोकांना या टबमध्ये फेकतात.

Worldwide Holi festival : इटलीची ऑरेंज होळी

इटलीत ऑरेंज बॅटल फेस्टिवल प्रसिद्ध आहे. हा उत्सव जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. या फेस्टिवलचे नाव ऑरेंज बॅटल फेस्टिवल असले तरी यामध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. स्पेन प्रमाणेच लोक एकमेकांच्या अंगावर टोमॅटो फेकतात किंवा टोमॅटोचा ज्यूस टाकतात.

हे ही वाचा :

Ajit Pawar : मंत्रिमंडळात एकही महिला नसणं दुर्दैव; महिला दिनानिमित्त अजित पवारांची खंत

होळीच्या सुट्टीनंतर आजपासून अधिवेशन

Back to top button