Ajit Pawar : मंत्रिमंडळात एकही महिला नसणं दुर्दैव; महिला दिनानिमित्त अजित पवारांची खंत | पुढारी

Ajit Pawar : मंत्रिमंडळात एकही महिला नसणं दुर्दैव; महिला दिनानिमित्त अजित पवारांची खंत

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. परंतु एका गोष्टीची खंतही वाटते. एवढा मोठा आपला महाराष्ट्र आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी एकही महिला  मंत्रिमंडळात नसणं हे दुर्दैव आहे. ते कमीपणाचं वाटतं. महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नाही. मी अनेक वेळा जाहीर सभाच्यांवेळी, मीडियाच्यासमोर या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहासमोर देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. पण काय अडचण आहे हे मला कळायला मार्ग नाही. ही गोष्ट आम्हाला आणि तमाम महिला वर्गाला देखील पटत नाही,  अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि.८) माध्यमांसमोर व्यक्त केली. (Ajit Pawar)

Ajit Pawar : शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, त्याला उभा केलं पाहिजे

यावेळी अजित पवार म्हणाले, सहा मार्चपासून ते नऊ मार्च या दरम्यान काही भागामध्ये हवामान बदलल जाईल आणि त्या बदलामुळे अवकाळी पाऊस येईल, गारपीट येईल, तुफान वादळ येईल या गोष्टी घडतील अस सांगण्यात आलं होतं. या घटना  महाराष्ट्रात घडल्या आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक भागातील शेतकरी राजाच पीक त्यात आंबा, मका, ज्वारी, गहु, ऊस, संत्री भाजीपाला द्राक्षे, कांदा यांच प्रचंड नुकसान झाले आहे, दौऱ्या दरम्यान काही लोकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या.

आज राज्य अधिवेशनाचा दुसऱ्या आठवडातील पहिला दिवस आहे. आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, त्याला उभा केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणार आहोत. शेतकरी खरोखरच अडचणीत आहेत. सोशल मिडियावर काही क्लिप व्हायरल होताना दिसत आहेत. तो हतबल शेतकरी स्वतलाच मारुन घेत आहे. सरकारला कदाचित याचा अंदाज नसावा.  ते होळी आणि धुलिवंदन त्यामध्ये ते गुंतलेले होते. होळी महाराष्ट्राचा सण पण शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही लक्ष असाव. राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button