पुणे : एफटीआयआय’च्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

पुणे : एफटीआयआय'च्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ( एफटीआयआय) बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अश्विन अनुराग शुक्ला (३२, रा, गोवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. एफटीआयआय मधील बॉयज हॉस्टेल एस १२ बी ब्लॉक रूममध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहतीनुसार , शुक्रवारी (दि.५) सकाळी नऊच्या सुमारास एफटीआयआय मधील एक रूम आतमधून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर तत्काळ डेक्कन पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी खिडकीतून पाहिल्यानंतर आतमध्ये तरुणाने गळफास घेतल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाला पाचारण करून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

Back to top button