APJ Abdul kalam thoughts : माजी राष्‍ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जगणं शिकवणारे १० प्रेरणादायी विचार | पुढारी

APJ Abdul kalam thoughts : माजी राष्‍ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जगणं शिकवणारे १० प्रेरणादायी विचार

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी राष्‍ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज स्मृतीदिन. २७ जुलै २०१५ रोजी त्‍यांचे निधन झाले. मिसाईल मॅन म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे विचार हे नेहमीच विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणसासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. चला जाणून घेऊया त्‍यांचे  १० प्रेरणादायी विचार…

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

  • यशस्वी कथा वाचू नका, त्यांने केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
  • जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील.
  • प्रश्न विचारणे हे एका विद्यार्थ्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या.
  • आपल्या मिशनमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण आपल्या मिशनमध्ये दृढ असले पाहिजे.
  • जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही, कोणीही तुमचा आदर करणार नाही. या जगात भीतीला स्थान नाही. केवळ सामर्थ्य सामर्थ्याचा आदर करते.

  • एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
  • संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
  • स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.
  • लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचे कौशल्य, व्यक्तिमत्व आणि आनंद देशाच्या सर्वांगीण समृद्धी, शांतता आणि आनंदासाठी आवश्यक आहे.
  • आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकता आणि निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील.

Back to top button