दिशा पटानीची जांभळ्या पोशाखात एन्ट्री; काडेपेटीच्या आकाराच्या पर्समध्ये काय असावे, नेटकऱ्यात कुतुहल | पुढारी

दिशा पटानीची जांभळ्या पोशाखात एन्ट्री; काडेपेटीच्या आकाराच्या पर्समध्ये काय असावे, नेटकऱ्यात कुतुहल

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांचे खास नाते अनेक प्रसंगांमधून समोर येत असते. आताही दिशाने टायगरच्या ‘हीरोपंती-2’च्या स्क्रिनिंगला हजेरी लावून आपले नाते किती मजबूत आहे हे दाखवले आहे. यावेळी ती अत्यंत तोकडा पोशाख परिधान करून आली होती व फोटोग्राफर्सना तिने आकर्षक पोजमध्ये फोटोही काढू दिले.

तिच्या या जांभळ्या पोशाखातील फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे तिच्या हातात एखाद्या काडेपेटीइतक्या आकाराची पर्स होती. इतक्या छोट्या पर्समध्ये तिने काय ठेवले असावे याचे कुतुहल नेटकर्‍यांना वाटले आणि त्याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या! दिशाने सध्या करण जोहरच्या ‘योद्धा’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये तिच्यासमवेत सिद्धार्थ मल्होत्रा आहे.

याचवर्षी तिचा ‘एक व्हिलन-2’ हा चित्रपटही येणार आहे. खासगी आयुष्यात तिची टायगरबरोबरची मैत्री चर्चेत असते. दिशा आणि टायगर सतत एकत्र दिसत असले तरी दोघांनी कधीही आपण एकमेकांना डेट करतो किंवा आपण रिलेशनशीपमध्ये आहोत असे जाहीररीत्या म्हटलेले नाही. ‘बागी-2’ची ही जोडी पडद्यावर जशी एकत्र दिसते तशीच बाहेरही सतत एकत्र असते हे विशेष!

Back to top button