येडियुराप्पा यांच्यासह आठजणांना उच्च न्यायालयाची नोटीस | पुढारी

येडियुराप्पा यांच्यासह आठजणांना उच्च न्यायालयाची नोटीस

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधींच्या भ्रष्टाचारप्रकरणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, त्यांचे पुत्र विजयेंद्र यांच्यासह आठ जणांविरुद्ध उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

याप्रकरणी खटला दाखल करण्यासाठी परवानगी न मिळाल्याने याआधी न्यायालयाने याचिका फेटाळली होती. याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते टी. जे. अब्राहम यांनी पुन्हा याचिका दाखल केली होती.

त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने येडियुराप्पा, त्यांचे पुत्र विजयेंद्र, शशिधर मर्डी, संजय श्री, चंद्रकांत, रामलिंगम, एस. टी. सोमशेखर, के. रवी यमकनमर्डी अशा आठजणांना नोटीस जारी केली आहे.

सध्या येडियुराप्पा मुख्यमंत्री नसल्याने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यास पूर्व परवानगीची गरज नसल्याचा युक्तिवाद अब्राहम यांच्या वकिलांनी मांडला.

उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने येडियुराप्पांचा त्यांचे कुटुंबीय भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप असल्याने चौकशी आवश्यक असल्याचे सांगितले. बोगस कंपनी स्थापन करून कोट्यवधीची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली होती. कोट्यवधीची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली होती; पण त्याविरुद्ध अब्राहम यांनी लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाकडे खासगी तक्रार दाखल केली होती.

Back to top button