IPL 2022 : आयपीएलमध्ये जोस बटलरचे वादळ कायम, विराट कोहलीलाही टाकले मागे | पुढारी

IPL 2022 : आयपीएलमध्ये जोस बटलरचे वादळ कायम, विराट कोहलीलाही टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिमाखदार विजय मिळवला. जोस बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या या हंगामातील सर्वांत मोठा स्कोर उभा केला. देवदत्त पडिकल आणि जोस बटलरने पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागिदारी रचली. ( IPL 2022 )

राजस्थान रॉयल्सने दिल्लीसमोर २२३ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर दिल्लीचा संघ २०७ धावात गुंडाळला. जोस बटलरने काल आयपीएलच्या या हंगामातील तिसरे शतक झळकवले. बटलरने ७ सामन्यांमध्ये ४९१ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. त्याबरोबरच त्याने अनेक विक्रम आपल्या नाववर केले आहेत. ( IPL 2022 )

विराट कोहलीचा विक्रम मोडीत

जोस बटलरने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. बटलर आयपीएलमध्ये ७ इंनिंग्जमध्ये ३ शतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला आहे. यापुर्वी विराट कोहलीने ९ इंनिंग्जमध्ये ही कामगिरी केली होती. बटलरने आतापर्यंत सात सामने खेळून तीन शतके झळकावली आहेत. बटलरने पहिले शतक मुंबईविरुद्ध (100) आणि दुसरे शतक (103) कोलकाताविरुद्ध ठोकले होते. ( IPL 2022 )

आता केवळ विराट कोहली त्याच्या पुढे आहे. कोहलीने 2016 च्या आयपीएलमध्ये चार शतके ठोकली होती. ख्रिस गेल, हाशिम आमला, शिखर धवन, शेन वॉटसन या अन्य फलंदाजांनी आयपीएलमध्ये दोन शतके लगावली आहेत. ( IPL 2022 )

जोस बटलर आणि देवदत्त पडिकलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी सर्वांत मोठी भागिदारी रचली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागिदारी केली. याबरोबरच जोस बटलर मुंबईच्या तिन्ही स्टेडियमवर शतक झळकवणारा दुसरा खेळाडू बनला आहे. यापुर्वी वसीम जाफर यांनी ही कामगिरी केली होती. दिल्ली कॅपिटल्स वि. सामन्यात जॉस बटलरने ५७ चेंडूमध्ये शतक लगावले आहे. ( IPL 2022 )

हेही वाचलतं का?

Back to top button