मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी घेतंय गैरफायदा : खासदार श्रीरंग बारणे यांचा आराेप | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी घेतंय गैरफायदा : खासदार श्रीरंग बारणे यांचा आराेप

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस मुद्दाम शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. निधी वाटपातसुद्धा दुजाभाव केला जात आहे. सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी कॉंग्रेस घेत आहे.  मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस गैरफायदा घेत आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी श्रीरंग बारणे हे आज (दि. २२) रोजी औरंगाबादमार्गे जालनाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी औरंगाबादेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. तीच जागा सोडण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. यानंतर औरंगाबाद दौऱ्यावेळी बारणे म्हणाले की, ज्यांनी ही मागणी केली ते कोण आहेत?, त्यांना मी ओखळत नाही?. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की करायला लावली, हे आधी शोधलं पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तीन घटक पक्ष आहेत. मात्र, या सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी कॉंग्रेस घेत आहे.  मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस गैरफायदा घेत आहे, असाही आराेप बारणे यांनी यावेळी केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button