पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेमध्ये भारताने पदकांचे शतक लगावले आहे. आजपर्यंतचही भारताची आशियाई पॅरा गेम्समधील सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१८ साली झालेल्या स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३३ कांस्य अशी एकूण ७२ पदके मिळवली होती. पण यावेळी भारताने मागील पदकांचा आकडा पार करत पदकांचे शतक झळकावले आहे.
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत १०८ पदकांची कमाई केली आहे. यात २८ सुवर्ण, ३१ रौप्य, ४९ कांस्य मिळून एकूण १०८ पदके मिळवली. पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानी आहे.
संबंधित बातम्या
आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० पदके मिळवणे हा आनंदाचा क्षण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे. "आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० पदके! हा एक अतुलनीय आनंदाचा क्षण. हे यश आमच्या खेळाडूंची निखळ प्रतिभा, मेहनत आणि दृढनिश्चयाचे फळ आहे. हा उल्लेखनीय मोलाचा क्षण आमचे हृदय अपार अभिमानाने भरून टाकणार आहे. मी आमचे अतुलनीय खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांच्यासोबत काम करणार्या संपूर्ण सपोर्ट सिस्टमचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो." असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
"भारताने पॅरा गेम्समध्ये इतिहास रचला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आहे! #AsianParaGames मध्ये भारताने १०० पदके जिंकली आहेत," असे भारतीय क्रीडा प्राधिकरण X वर पोस्ट करत म्हटले आहे.
हेही वाचा :