Maratha Reservation Protest : गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेचे मोडनिंब येथे दहन | पुढारी

Maratha Reservation Protest : गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेचे मोडनिंब येथे दहन

मोडनिंब : पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांना अटक करा अशी मागणी करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध म्हणून मोडनिंब येथे त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी निषेध घोषणा देण्यात आल्या. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.(Maratha Reservation Protest)

सदावर्ते यांच्या प्रतिमेचे दहन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत उपस्थित आणि बोंबाबोंब केली. प्रशांत गिड्डे, संतोष पाटील, प्रकाश गिड्डे, सौदागर जाधव, व्ही. के. पाटील, बाबुराव सुर्वे यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या अनेकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा 

Back to top button