

देवकोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : अतिवृष्टीमुळे (#kolhapurflood) झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या गुरुवारी (ता. २९) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पुरामुळे (#kolhapurflood) कोल्हापूर शहरासह जिल्ह्याती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमळे (#kolhapurflood) शहरासह जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आला होता. गेले आठ दिवस शहरासह नदीकाठची शेती पाण्यात आहे.
त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा
कोल्हापुरात शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी व्यापाऱ्यांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात येणार आहेत.
ते शिरोळ, हातकणंगले आणि शहरातील काही भागाचा दौरा करून पाहणी करणार आहेत.
अधिक वाचा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शिरोळ आणि हातकणंगलेचा दौरा करणार असून त्यानंतर चिखली, आंबेवाडी येथे जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधणार आहेत.
तसेच शहरातील पूरग्रस्त भागालाही भेट देणार आहेत. फडणवीस यांचा गुरुवारी शासकीय विश्रामगृहात मुक्काम असेल.
त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पूरग्रस्त भागाची भेट घेऊन दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
कोकणात सुरू असलेले राजकीय नेत्यांचे दौरे आणि सरकारी यंत्रणांवर पडणारा ताण याबाबत मंगळवारी शरद पवार यांनी संबंध नसलेल्या नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेत असे म्हटले होते.
त्यानंतर फडणवीस यांनी आम्ही दौरे केल्याने यंत्रणा जागी होते असे प्रत्युत्तर दिले होते.
कोकणच्या दौऱ्यावर गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाल्याने धारेवर धरले होते.
एकेरी उल्लेख करत 'कामाला लावण्याचा' इशाराही दिला होता.
हेही वाचले का