China On India-Maldives Row : ‘मालदीव’ प्रकरणी चीनने नाक खुपसले; म्‍हणे, “भारताने उदार मनाने …” | पुढारी

China On India-Maldives Row : 'मालदीव' प्रकरणी चीनने नाक खुपसले; म्‍हणे, "भारताने उदार मनाने ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्‍या प्रकरणी मालदीववर चौफेरे टीका सुरु आहे. अशावेळी चीनने यामध्‍ये नाक खुपसले आहे. कम्युनिस्ट सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’च्या माध्यमातून चीनने भारताला सल्‍ला देण्‍याची धडपड केली आहे. (China On India-Maldives Row)

मालदीवला कधीही भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही

मालदीवला कधीही भारतापासून दूर राहण्यास सांगितले नाही. भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांना धोका म्हणून पाहत नाही. भारताने उदार मनाने विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे. दक्षिण आशियातील देशांना चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याचा भारताने विचार करायला हवा, असे ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे. (China On India-Maldives Row)

मालदीवचे राष्‍ट्राध्‍यक्ष मुइज्‍जू चीन दौर्‍यावर

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ग्लोबल टाइम्सने विश्लेषकांच्या माध्यमातून म्हटले आहे की, मुइझ्झूच्या भेटीचे वर्णन चीन समर्थक म्हणून करणे हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते. या क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी भारताने आपल्या शेजारी देशांसोबतचे ताणले गेलेले संबंध चीनवर फोडू नये, असेही बडेबोल सुनावले आहेत. (China On India-Maldives Row)

दक्षिण आशियातील देशांना चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही

‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखात म्‍हटले आहे की, “भारत आणि मालदीवसोबत चीन त्रिपक्षीय सहकार्य करण्यास इच्छुक आहे. भारताने खुल्या मनाने विचार केला पाहिजे. आपला प्रभाव या प्रदेशात कायम राहावा, असे भारताचे मत आहे. मालदीव आणि इतर शेजारी देशांनी त्याचे अनुकरण केले आणि ते चीनपासून दूर राहिले. दक्षिण आशियातील देशांना चीनकडे दुर्लक्ष करता येणार नाही, याचा भारताने विचार करायला हवा.”

हेही वाचा : 

 

Back to top button