India-Maldives Relations : काय सांगतो भारत – मालदीवचा वाणिज्य इतिहास? | पुढारी

India-Maldives Relations : काय सांगतो भारत - मालदीवचा वाणिज्य इतिहास?

मालदीव हा देश सुमारे १,१९२ बेटांचा एक हिंदी महासागरातील द्वीपसमूह आहे, जो वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. तसेच जगभरातील पर्यटकांसाठी एक नंदनवनच आहे. मालदीव भारताच्या लक्षद्वीप बेटांच्या दक्षिणेस स्थित आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांतील दळणवळणावर एक दृष्टिक्षेप.

१९६५ मध्ये मालदीवला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय, व्यापारी संबंध प्रस्थापित करणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रेसर.

२००९ पासून मालदीवच्या विनंतीनुसार भारताने मालदीवमध्ये नौदलाचे अस्तित्व कायम ठेवले आहे.

मालदीवचे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत मालदीवला वेगवेगळ्या स्वरूपात मदत करतो आहे.

उभय देशांतील सध्याचा द्विपक्षीय व्यापार : ७०० कोटी

मालदीवमधील भारतीय निर्यात क्षेत्र : कृषी, पोल्ट्री उत्पादन, साखर, फळे, भाजीपाला, मसाले, तांदूळ, गव्हाचे पीठ, कापड, औषध, औद्योगिक उत्पादने.

मालदीवची एकूण लोकसंख्या : ५.२५ लाख

मालदीवमधील भारतीयांची संख्या : २९ हजार

प्राथमिक, माध्यमिकमधील भारतीय शिक्षक : २५ टक्के

हेही वाचा : 

Back to top button