Lakshadweep Vs Maldives Row : लक्षद्वीपचे प्रमोशन, मालदीवचे डिमोशन | पुढारी

Lakshadweep Vs Maldives Row : लक्षद्वीपचे प्रमोशन, मालदीवचे डिमोशन

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा करीत तेथे अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले. कोची-लक्षद्वीप समूह सबमरिन ऑप्टिकल फायबर कनेक्शनचाही शुभारंभ केला. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात जास्त चर्चा रंगली ती त्यांच्या लक्षद्वीपच्या किनाऱ्यावरील फोटोशूटची. मोदींच्या या छोट्याशा कृतीने मालदीवला मात्र मोठा झटका बसला आहे.

संबंधित बातम्या : 

लक्षद्वीपची स्तुती करताना मोदी म्हणाले की, लक्षद्वीपची सुंदरता शब्दात बांधणे खूप कठीण आहे. जगातील वेगवेगळ्या देशांतील द्वीप पाहण्यास जाणाऱ्यांनी एकदा लक्षद्वीपची सुंदरता जरूर पाहावी. मोदींच्या या उद्‌गाराचा उद्देश भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांना लक्षद्वीपकडे वळवण्याचा आहे. याचा परिणाम लगेच दिसून आला. अनेक भारतीयांनी मालदीवमधील हॉटेल बुकिंग रद्द करून लक्षद्वीपला पसंती दिली आहे.

चीनधार्जिण्या धोरणाला झटका

लक्षद्वीपमध्ये लोकांचे वाढते कुतूहल तेथील पर्यटन व स्थानिक पारंपरिक उद्योगाला चालना देणारे ठरेल. याचा परिणाम मालदीवच्या पर्यटनावर होऊ शकतो. मालदीवमधील नवीन सरकारने भारतविरोधी व चीनधार्जिणे धोरण स्वीकारले आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारतीय सेनेला मालदीवमधून परत पाठवण्याची घोषणा केली आहे. ते चीन दौऱ्यावरही जाणार आहेत. हिंदी महासागरातील सामरिक महत्त्व असलेले हे बेट चीनच्या प्रभावाखाली येणे भारताला परवडणारे नाही. म्हणून मोदींनी मालदीवच्या मर्मावरच बोट ठेवल्याचे मानले जाते.

हेही वाचा : 

 

Back to top button