India-Maldives row | पर्यटनाला फटका बसताच मालदीव टूरिझम इंडस्ट्रीला आली जाग, मंत्र्यांना फटकारले

India-Maldives row | पर्यटनाला फटका बसताच मालदीव टूरिझम इंडस्ट्रीला आली जाग, मंत्र्यांना फटकारले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव सध्या भारतात चर्चेत आहे. मालदीव सरकारमधील काही उपमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यावर भारत सरकारनेही तीव्र नाराजी व्यक्त केली. मालदीवमधील भारताच्या उच्चायुक्तांनी याबाबत मालदीव सरकारकडे तक्रार केली. तसेच सोमवारी, भारतातील मालदीवच्या राजदूताला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने समन्स बजावले आणि मालदीवच्या काही उपमंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीवर तीव्र चिंता व्यक्त केली होती. याचदरम्यान मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्रीने यांच्याकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (India-Maldives row)

काही मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर मालदीव असोसिएशन ऑफ टूरिझम इंडस्ट्री (MATI) ने तीव्र निषेध नोंदवला आहे. भारत हा आपचा सर्वात जवळचा शेजारी आणि मित्र देश आहे. MATI ने जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, "आमच्या संकटकाळात भारत नेहमीच पहिल्यांदा मदतीला धावला आहे. भारतातील जनतेने आमच्याशी जे घनिष्ट संबंध जोपासले त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत."

भारताचे मालदीव पर्यटन उद्योगात महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. कोविड काळात भारत आमच्या मदतीला आला; ज्यामुळे आमची बिघडलेली परिस्थिती सुधारण्यात मदत झाली. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध पुढील पिढ्यांसाठी कायम राहावेत ही आमची इच्छा आहे. यासाठी आपण आक्षेपार्ह टिप्पणी करणे टाळले पाहिजे, असे मालदीव टूरिझम इंडस्ट्रीने म्हटले आहे.

#ChaloLakshadweep मोहीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या विरोधात आक्षेपार्ह टीका केल्यामुळे मालदीव चर्चेत आहे. यानंतर सोशल मीडियावर 'boycott Maldives' असा ट्रेंड सुरु झाला. दरम्यान, EaseMyTrip चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग निलंबित करण्याची घोषणा केली आहे. तसेच ऑनलाइन ट्रॅव्हल सोल्यूशन्स प्रदाता EaseMyTrip ने #ChaloLakshadweep अशी मोहीम सुरू केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यासोबतच त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे केले होते. यानंतर मालदीवच्या उपमंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र, या ट्विटवर टीका झाल्यानंतर त्यांनी ते डिलीटही केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भारताविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्‍याप्रकरणी मालदीवने तीन मंत्र्यांना निलंबित केले. (India-Maldives row)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news