राष्‍ट्राध्‍यक्ष मुइझ्झू यांची हकालपट्टी करा : मालदीवचे अल्‍पसंख्‍यांक नेते अझीम यांची मागणी | पुढारी

राष्‍ट्राध्‍यक्ष मुइझ्झू यांची हकालपट्टी करा : मालदीवचे अल्‍पसंख्‍यांक नेते अझीम यांची मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्‍या प्रकरणी मालदीववर चौफेरे टीका सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असणारे राष्‍ट्राध्‍यक्ष मोहम्‍मद मुइझ्झू (Maldive President Mohamed Muizzu) यांची पदावरुन हकालपट्टी करा, अशी मागणी मालदीवमधील विराेधी पक्ष नेते अली अझीम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्‍या माध्‍यमातून केली आहे.

मालदीवच्‍या मंत्र्यांची PM मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यासोबतच त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे केले होते. यानंतर मालदीवच्या युवा सक्षमीकरण उपमंत्री मरियम शिउना यांनी पीएम मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र, या ट्विटवर टीका झाल्यानंतर त्यांनी ते डिलीटही केले. (Maldive President Mohamed Muizzu)

Maldive President : ‘मालदीवचे राष्‍ट्राध्‍यक्ष मुइझ्झू यांची हकालपट्टी करा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना अविश्वास ठरावासह पदच्युत करण्यात यावे, अशी मागणी संसदीय अल्पसंख्याक नेते अली अझीम यांनी केली आहे. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, आम्‍ही मालदीवच्‍या परराष्‍ट्र धोरणाची स्‍थिरता राखण्‍यासाठी कटीबद्‍ध आहोत. कोणत्‍याही शेजारी देशाबरोबर मैत्री अबाधित ठेवण्‍यासघठी समर्पित आहोत. आपण राष्‍ट्राध्‍यक्ष मोहम्‍मद मुइझ्झू यांना सत्तेवरून काढून टाकण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास तयार आहोत? मात्र सरकार मतदानाला तयार आहे का, असा सवालही त्‍यांनी केला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा मालदीववर मोठा परिणाम होताना दिसत आहे. रविवारी सोशल मीडियावर भारतीय नेटकर्‍यांकडून मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली. सोशल मीडियावर अनेक भारतीयांनी दावा केला की, त्यांनी मालदीवची सहल रद्द केल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील लक्षद्वीपला पर्यायी पर्यटनस्थळ म्हणून निवड केल्‍याचे सांगितले. आज भारत सरकारने मालदीवच्या उच्चायुक्तांना बोलावले आहे. भारत सरकारने समन्स बजावल्यानंतर मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब भारतीय परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते येथून निघून गेले.

मालदीवच्‍या मंत्र्यांनी भारतावर केलेल्‍या टीकेमुळे देशातील अनेक सेलिब्रिटींनी X वर लोकांना मालदीवला जाण्याऐवजी देशांतर्गत पर्यटन स्थळे पाहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर काही भारतीयांनी मालदीवचा त्यांचा नियोजित दौरा रद्द करत असल्याचा दावाही केला होता.

हेही वाचा : 

 

 

Back to top button