Israel-Hamas War : हमासकडून ओलिस ठेवलेल्‍या २ इस्रायली महिलांची सुटका | पुढारी

Israel-Hamas War : हमासकडून ओलिस ठेवलेल्‍या २ इस्रायली महिलांची सुटका

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. (इस्रायल हमास युद्ध) आणि 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. दरम्‍यान कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर चार जणांची सुटका करण्यात आली आहे. गाजाने दावा केला आहे की, त्‍यांचे ५ हजारपेक्षा अधिक लोक ठार झाले आहेत.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी आणखी दोन ओलिसांची सुटका केल्याचा दावा केला आहे. हमासने सोमवारी सांगितले की, दोन अमेरिकन नागरिकांची सुटका केल्यानंतर, गाझा पट्टीमध्ये ओलीस ठेवलेल्या दोन महिलांचीही सुटका केली आहे.

Back to top button