Israel-Hamas War : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन इस्रायलमधील तेल अविवमध्ये दाखल | पुढारी

Israel-Hamas War : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन इस्रायलमधील तेल अविवमध्ये दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्राईल-हमास संघर्ष सुरु आहे. इस्रायलच्या समर्थनार्थ पाश्चात्य देश एकवटले आहेत. आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे तेल अवीव येथे आज सकाळी (दि.२४) पोहचले आहेत. (Israel-Hamas War)

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला १७ दिवस उलटले आहेत. दरम्यान, पाश्चात्य देशांच्या काही राष्ट्रप्रमुखांनी या संघर्षात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करून त्यांना समर्थन दिले आहे.  आता डच पंतप्रधान मार्क रुट्टे आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन इस्रायलला भेटीवर आहेत. आज (दि.२४) सकाळी तेल अवीव येथे पोहचले आहेत. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जर्मन चान्सलर यांनीही इस्रायलला भेट दिली आहे.

इस्रायलला या देशांचा पाठिंबा

अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटन या देशांच्या नेत्यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवत एकता दाखवली आहे. त्यांनी इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचे सांगितले. या देशांनी इस्रायलला आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचे पालन करण्याचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचे आवाहनही केले आहे.

हेही वाचा 

Back to top button