Hamas release first video : हमासने अपहरण केलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Hamas release first video : हमासने अपहरण केलेल्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासने अपहरण केलेल्या तरुणीचा एक सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमवारी (दि. १६) रात्री हा व्हिडिओ समोर आला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर ही पहिली व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडिओतील तरुणीने तिच्या अपहरणाबाबत माहिती देत हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

जेरुसलेमने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये  अपहरण केलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ आहे. जेरुसलेमने हा ओलीस ठेवण्यात आलेल्यांपैकी पहिल्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. व्हिडिओतून मिया शेम ही तरुणी संवाद साधते. तिच्यावर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत ती माहिती देते.

मियावर वैद्यकीय उपचार

हमासने इस्रायलवर केलेल्या रक्तरंजित हल्ल्यादरम्यान सुपरनोव्हा संगीत महोत्सवातून मियाचे अपहरण केले. फ्रेंच-इस्त्रायली मीयाचे वय २१ वर्षे आहे. या व्हिडिओत मीयाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. एक डॉक्टर तिच्यावर वैद्यकीय उपचार करत आहेत. यामध्ये तिच्या हाताला बॅडेड गुंडाळताना दिसून येते. यानंतर ती स्वत: कॅमेऱ्यासमोर बोलते.

व्हिडिओतून मिया संवाद साधते

“हाय, मी मिया शेम आहे, शोहम येथील असून २१ वर्षांची आहे. सध्या मी गाझामध्ये आहे. मी Sderot येथून शनिवारी (दि. ७) सकाळी लवकर परतले. मी एका पार्टीत होते. माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली. माझ्या हातावर रुग्णालयात (गाझा) मध्ये 3 तास शस्त्रक्रिया झाली. ते माझी काळजी घेत आहेत, मला औषध देत आहेत, सर्व काही ठीक आहे,” जेरुसलेम पोस्टने व्हिडिओमध्ये तिच्या मातृभाषेत ही माहिती दिल्याचे सांगितले आहे. “मला माझ्या आई-वडिलांच्या घरी जायचं आहे. कृपया मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा.” अशी विनंती देखील मीयाने केली आहे.

यापूर्वीही अपहरण झालेल्या नागरिकांची व्हिडिओ व्हायरल

दि. 8 ऑक्टोबर रोजी जवळपास 100 इस्त्रायली नागरिकांना हमासने ओलीस ठेवण्यात आले असल्याची माहिती इस्त्रायली दूतावासाने दिली होती. तत्पूर्वी हमासने इस्त्राईलवर अत्यंत क्रूर आणि मोठा हल्ला केला. हमासच्या या हल्ल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले की, एका घराच्या कोपऱ्यात एक जोडपे आपल्या लहान मुलांना घेऊन बसले आहे. समोर हमासचे दहशतवादी हातात बंदुका घेऊन फिरत आहेत आणि त्यांना धमकावत आहेत. लहान मुलांचा संवाद आणि त्यांनी आई-बाबांना विचारलेलेल प्रश्न ऐकून आणि त्यांच्याकडे पाहून हृदय पिळवटून जाते.

हेही वाचा

Back to top button