Israel–Hamas war : भय इथले संपत नाही! मृत्यूनंतर ओळख पटण्यासाठी पॅलेस्टिनी चिमुरडे हातावर लिहितात नाव | पुढारी

Israel–Hamas war : भय इथले संपत नाही! मृत्यूनंतर ओळख पटण्यासाठी पॅलेस्टिनी चिमुरडे हातावर लिहितात नाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझा पट्टीवर इस्रायली हल्ल्यांचा सर्वाधिक फटका गाझातील मुलांना बसला आहे. इस्त्रायली हवाई हल्ल्यांमध्ये एका आठवड्यात सुमारे ७०० हून अधिक मुलांचा बळी गेला आहे. इस्रायलच्या बॉम्बस्फोटानंतर जखमी झालेल्या मुलांचे ह्रदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ आणि फोटो समोर येत असतानाच यातून आणखी एक भीषण वास्तव समोर येत आहे. पॅलेस्टिनी मुले बॉम्बस्फोटानंतर आपल्या शरीराची ओळख पटावी यासाठी त्यांच्या हातावर त्यांची नावे आणि ओळखपत्र क्रमांक लिहितात. (Israel–Hamas war)

संबंधित बातम्या : 

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हमाससोबतच्या युद्धाचा अकरावा दिवस सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टीतील सुमारे २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नागरिकांसह दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तर हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल्या २५० नागरिकांना हमासने गाझामध्ये ओलिस ठेवले आहे. यामध्ये बालकांसह ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, इस्रायलने हल्ले वाढविल्यानंतर हमासने शरणागती पत्करली असून ओलिसांना सोडण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, इस्रायली हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांचे व्हिडिओ आणि फोटो समोर येत आहेत. बाँम्बस्फोटामध्ये बळी पडलेल्या या मुलांच्या शरीराची ओळख पटविणे देखील अवघड झाले आहे. यादरम्यान गाझाच्या अनेक भागातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इस्रायलच्या शक्तीशाली स्फोटात गाझातील मृत्यूमूखी पडलेल्या लहान मुलांच्या शरीराचे अवशेष विखूरले आहेत. यातील काही मुलांच्या हातावर त्यांचे नाव आणि आयडी क्रमांक लिहिल्याचे दिसत आहे. व्हायरल एका फोटोमध्ये अया अब्दुलरहमान नहवान नावाच्या मुलीचा एक हात सापडला आहे. या चिमुरडीने तिच्या नावाखाली ओळखपत्र क्रमांक लिहिला होता, यावरून तिची ओळख पटविण्यात आली.

युनिसेफच्या अहवालात सुमारे ७०० पॅलेस्टिनी मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून सुमारे १९०० जण जखमी झाले आहेत. गाझामधील आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी इस्रायली हल्ले सुरू झाल्यापासून किमान २ हजार ७५० पॅलेस्टिनी ठार झाले असून ९ हजार ७०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button