Hamas-Israel War : आता हमासची खैर नाही; इस्त्रायलचे ‘ब्रह्मास्त्र’ सज्ज; लेसरद्वारे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता

Hamas-Israel War : आता हमासची खैर नाही; इस्त्रायलचे ‘ब्रह्मास्त्र’ सज्ज; लेसरद्वारे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता
Published on
Updated on

तेल अवीव :  हमासला निर्वाणीचा तडाखा देण्यासाठी या युद्धात इस्रायल प्रथमच आपल्याकडील 'ब्रह्मास्त्रांचा वापर करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या अस्त्राचे नाव आयरन बीम असे असून ही लेसर प्रणाली आहे. वीस वर्षे संशोधन करून इस्रायलने आयरन बीम विकसित केले असून येत्या दीड वर्षात पॅलेस्टाईनच्या सीमेवर हे अस्र तैनात करण्यात येणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. शत्रूकडून डागण्यात येणारे कोणतेही क्षेपणास्त्र जागीच नष्ट करण्याची अफलातून क्षमता आयरन बीममध्ये आहे. (Hamas-Israel War)

संबंधित बातम्या :

ही प्रणाली लगेचच वापरावी लागणार नाही, असा इस्रायलमधील संरक्षणतज्ज्ञांचा अंदाज होता; मात्र हमासने मोसाद या इस्रायलच्या जगप्रसिद्ध गुप्तचर संस्थेलाही गुंगारा दिल्यामुळे आता इस्रायलने हे अस्त्र पॅलेस्टाईनच्या सीमेवर तैनात करायचा निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेनेही याकामी इस्रायलच्या शास्त्रज्ञांना मोलाची मदत केली आहे. जगातील सर्वोत्तम लेसर प्रणाली असे आयरन बीमचे वर्णन केले जाते. (Hamas-Israel War)

गाझा, लेबनॉन आणि सीरिया निशाण्यावर

इस्रायलने वीस वर्षांपूर्वीच हमाससारख्या दहशतवादी संघटनांचा धोका ओळखला होता. तेव्हापासून या देशाने क्षेपणास्त्रविरोधी लेसर प्रणाली विकसित करण्याचा सपाटा लावला. अहोरात्र नेटाने प्रयत्न केल्यानंतर ही अद्भूत प्रणाली विकसित करण्यात इस्रायलला यश आले. शंभर किलोवॅट लेसरचा प्रभाव सुमारे आठ ते दहा कि.मी. पर्यंत असतो, असे इस्रायलमधील 'याकोव लॅपिन' या वार्तांकन संस्थेने म्हटले आहे. आता जेव्हा पॅलेस्टाईनच्या सीमेवर ही प्रणाली तैनात केली जाईल, तेव्हा संपूर्ण जग आमच्या विस्मयकारी तंत्रज्ञानाच्या दर्शनाने थक्क होईल, असे इस्रायलने म्हटले आहे. (Hamas-Israel War)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news