पुढारी ऑनलाईन डेस्क: हमास- इस्रायल यांच्यात युद्ध पेटले आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना गाझा खाली करण्याचा इशारा दिला आहेत. दरम्यान, इस्रायलकडून गाझा शहरासह आसपासच्या भागात इस्रायलकडून हवाई हल्ला करण्यात येत आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या हल्ल्यात मृतदेहांचा खच पडला आहे. या पार्श्वभूमीवर दफनभूमीत जागा नसल्याने हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीतील मृतदेह हे आईस्क्रिम फ्रिजर ट्रकमध्ये ठेवले जात आहेत. असे येथील आरोग्य अधिकाऱ्याने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Israel-Hamas War)
गाझामधील आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झालेल्या पॅलेस्टिनींचे मृतदेह आईस्क्रिम फ्रिजर ट्रकमध्ये ठेवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. यामागे या मृतदेहांना रूग्णालयात हलवणे धोकादायक आहे. तसेच मृतदेह दफन करण्यासाठी दफनभूमीत जागा नाही. यामुळे हे मृतदेह आईस्क्रिम फ्रिजरमध्ये ठेवले जात आहेत. (Israel-Hamas War)
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर अनेक दशकांतील सर्वात प्राणघातक हल्ला केला. यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी गाझा पट्टीवर भयंकर बॉम्बफेक सुरू केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गाझा पट्टीतील अनेक पॅलेस्टिनी मारले गेलेत. यामुळे गाझा शहरात मृतदेहांचा खच पडला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज १० वा दिवस आहे. आत्तापर्यंत ३ हजार ५०० नागरिक मारले गेलेत. इस्रायलीमध्ये ९०० नागरिकांचा मृत्यू, तर २३०० नागरिक जखमी झालेत. गाझा पट्टीत १४० लहान मुले तर ६८७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३ हजार ५०० लोक जखमी झाले आहेत. (Israel-Hamas War)