पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी संघटना हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. आज ( दि. ८) इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझामधील हमास या दहशतवादी संघटनेच्या गुप्तचर प्रमुखाच्या निवासस्थानावर हल्ला केला, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली आहे.
दहशतवादी संघटना हमासच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखाच्या घरावर लढाऊ विमानांनी अलीकडेच लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला केला, असे इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) पोस्ट केले आहे. तसेच X वर हवाई हल्ल्याचे अपडेटही शेअर केले.
'जेरुसलेम पोस्ट'वर सायबर हल्ले
दैनिक जेरुसलेम पोस्टवर अनेक वेळा सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी अनेक सायबर हल्ले करून इस्रायलमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्राला लक्ष्य केले आहे. "आज सकाळी जेरुसलेम पोस्टला अनेक सायबर हल्ल्यांनी लक्ष्य केले होते, ज्यामुळे आमची साइट क्रॅश झाली," इस्रायली दैनिकाने X वर पोस्ट केले आहे.