पुढारी ऑनलाईन : इस्रायलमध्ये हमास दहशतवाद्यांचे १,५०० मृतदेह सापडले असल्याचे सांगत इस्रायली सैन्याने सीमेवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांनी सीमेवर संपूर्ण नियंत्रण मिळवले आहे. इस्रायली संरक्षण दलाचे (IDF) आंतरराष्ट्रीय प्रवक्ते रिचर्ड हेच्त यांनी सांगितले की, इस्रायलच्या हद्दीत गाझा पट्टीच्या आसपास हमास दहशतवाद्यांचे १,५०० मृतदेह सापडले आहेत आणि सोमवारी रात्रीपासून एकाही हमास दहशतवाद्याने इस्रायलमध्ये प्रवेश केलेला नाही. पण तरीही अजून घुसखोरीची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित बातम्या
हेच्त यांनी सांगितले की, गाझा शहर रिमल परिसरात सैन्याने हमासच्या शेकडो लक्ष्यांवर रात्रभर हल्ला केला. या ठिकाणी हमासची अनेक मंत्रालये आणि सरकारी इमारती आहेत. ते पुढे म्हणाले की रहिवाशांना हल्ल्याच्या आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून इमारती खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पॅलेस्टिनी नागरिकांनी रफाह क्रॉसिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, असे त्याने सुचवले होते. पण ते कोठे जातील अथवा वेळोवेळी बंद असलेल्या क्रॉसिंगचा वापर कसा करतील हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
याआधी इस्रायलचे ९०० सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तर पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी गाझा आणि वेस्ट बँकमध्ये सुमारे ७०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते.
इस्रायली सैन्याने सीमा परिसरातील सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सीमा भागात सैन्यांच्या ३५ बटालियन तैनात केल्या आहेत. "आम्ही पुढील ऑपरेशन्ससाठी पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत," असेही त्यांनी नमूद केले आहे.
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी मोठा हल्ला केला होता. यात इस्रायलमधील ९०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.
गाझाजवळील डझनभराहून अधिक शहरांमधून हजारो इस्रायली नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गाझा सीमेवरून घुसखोरी रोखण्यासाठी रणगाडे आणि ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. गाझामधील हवाई हल्ल्यांमुळे हजारो लोकांनी त्यांची घरे सोडून सुरक्षितस्थळी पलायन केले आहे.
हे ही वाचा :