Israel Hamas War : आम्ही युद्ध सुरू केले नाही मात्र ते संपवू : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा हमासला इशारा | पुढारी

Israel Hamas War : आम्ही युद्ध सुरू केले नाही मात्र ते संपवू : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा हमासला इशारा

तेल अवीव : पुढारी ऑनलाईन नेतन्याहू म्हणाले, “हमासला समजेल की त्यांनी आमच्यावर हल्ला करून ऐतिहासिक चूक केली आहे. याची किंमत त्‍यांच्याकडून आम्‍ही चुकती करून घेउ ते आणि इस्रायलचे इतर शत्रू पुढील अनेक दशके हे लक्षात ठेवतील.

इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज (मंगळवार) हमासला कडक इशारा देत म्हटले की, “इस्रायलने हे युद्ध सुरू केले नसले तरी ते ते समाप्त करेल”. हमासला प्रत्‍युत्‍तर देण्यासाठी म्हणून इस्रायलने 3 लाख राखीव सैनिकांना बोलावले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या अहवालानुसार, 1973 च्या योम किप्पूर युद्धानंतर इस्त्राईलने 4 लाख राखीव सैनिकांना पाचारण केल्यानंतरची ही सर्वात मोठी गोष्‍ट आहे.

“इस्रायल युद्धात आहे. आम्हाला हे युद्ध नको होते. ते अत्यंत क्रूर आणि रानटी पद्धतीने आमच्यावर लादले गेले. हे युद्ध इस्रायलने सुरू केले नसले तरी, इस्रायल ते संपवेल,” असे नेतन्याहू राष्ट्राला उद्देशून म्हणाले. ”

हमासने शनिवारी सकाळी अचानक केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 2,300 हून अधिक इस्रायली नागरिक जखमी झाले असून, 700 हून अधिक लोक ठार झाले आहेत.

ओलिस ठेवलेल्यांच्या दुर्दशेबद्दल, ते म्हणाले की, “हमासने निष्पाप इस्रायलींवर केलेले क्रूर हल्ले धक्कादायक आहेत: कुटुंबीयांना त्यांच्या घरात मारणे, एका उत्सवात शेकडो तरुणांना मारणे आणि अनेक महिला, मुले आणि वृद्धांचे अपहरण करणे. हमासच्या दहशतवाद्यांनी मुलांना बांधले, जाळले आणि मारले. ते रानटी आहेत.”

नेतान्याहू म्हणाले, “हमास ही आयएसआयएस आहे. आणि ज्याप्रमाणे सभ्यतेच्या शक्तींनी आयएसआयएसला पराभूत करण्यासाठी एकजूट केली, त्याचप्रमाणे सभ्यतेच्या शक्तींनी हमासचा पराभव करण्यासाठी इस्रायलला पाठिंबा दिला पाहिजे.” त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि इतर जागतिक नेत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.


हेही वाचा : 

Back to top button