Israel Hamas war | इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टी उद्ध्वस्त, मृतांचा आकडा १६०० वर

Israel Hamas war | इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टी उद्ध्वस्त, मृतांचा आकडा १६०० वर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : इस्रायल- हमास युद्धातील मृतांचा आकडा आतापर्यंत १६०० वर गेला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सुमारे ९०० लोक मरण पावले आहेत. यात एका संगीत महोत्सवात हमासच्या हल्लेखोरांनी हत्या केलेल्या २६० लोकांचा समावेश आहे. दरम्यान, इस्रायलने प्रत्युत्तरादाखल गाझावर हल्ले सुरू केल्यापासून पॅलेस्टिनी मधील ७०४ लोक ठार झाले आहेत. (Israel-Hamas war)

इस्रायलने गाझा पट्टीवर रात्रभर बॉम्बफेक सुरू ठेवली. या हल्ल्यात शेकडो निवासी इमारत उद्ध्वस्त झाल्या आहेत. या हल्ल्यात दोन पॅलेस्टिनी पत्रकारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

संबंधित बातम्या 

हमास दहशतवादी गटाच्या विरोधात इस्रायल मोठ्या ताकदीचा वापर करेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. दरम्यान, इस्रायलने कोणतीही पूर्वसूचना न देता गाझावर हवाई हल्ले केल्यास ओलिस ठेवलेल्या लोकांना ठार मारण्याची धमकी हमासच्या सशस्त्र विंगने दिली आहे. हमासने अनेक लोकांना ओलीस ठेवले आहे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत. गाझामध्ये १५० लोकांना ओलीस ठेवण्यात आल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सीएनएनच्या वृत्तानुसार, लेबनॉनच्या उत्तर सीमेजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर इस्रायल संरक्षण दलातील (IDF) अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, असे इस्रायलमधील रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गॅलिली मेडिकल सेंटरने एका निवेदनात म्हटले आहे की, उत्तर यानोच-जाट जिल्ह्यातील ४० वर्षीय अधिकाऱ्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. "त्यांना डॉक्टरांनी वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण दुर्दैवाने त्यांना मृत घोषित करावे लागले," असे निवेदनात म्हटले आहे. (update on israel hamas war)

१,३७,००० हून अधिक लोकांनी गाझामधील संयुक्त राष्ट्रांच्या आपत्कालीन केंद्रावर आश्रय घेतला आहे, संयुक्त राष्ट्राच्या रिलीफ एजन्सीने म्हटले आहे.

इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी यापूर्वी गाझा पट्टीला संपूर्ण वेढा घालण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्न, इंधन, वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला होता. (why is hamas attacking israel now)

दरम्यान, पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या समर्थनार्थ जगभरात २४ तास निदर्शने सुरू आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news