israel hamas war : इस्त्रायल-हमास संघार्षाचा भारतावर काय परिणाम होणार? | पुढारी

israel hamas war : इस्त्रायल-हमास संघार्षाचा भारतावर काय परिणाम होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायलने ‘हमास ‘विरोधात युद्धाची अधिकृत घोषणा केली असून आपली सारी लष्करी ताकद पणाला लावत संपूर्ण गाझा पट्टी क्षेपणास्त्र व बॉम्बवर्षावाने भाजून काढायला सुरुवात केली आहे. शेकडो इमारती या हल्ल्यात भुईसपाट झाल्या असून हल्ल्यांचा जोर वाढला आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या या लढाईत ६०० इस्त्रायली तर ४०० हून अधिक पॅलेस्टिनी असे एक हजारहून अधिक लोक मारले गेले. या युद्धाचा भारतावर देखील परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या : 

इस्त्रायल भारताचा १० वा सर्वात मोठा भागीदार देश आहे. रशियाखालोखाल इस्त्रायल भारताला सर्वाधिक लष्करी सामग्रीचा पुरवठा करतो. दोन देशांतील लष्करी व्यापारच ७४ हजार कोटी रुपयांचा आहे.

इस्रायल-हमास युद्ध लांबत गेले अथवा त्याची व्याप्ती वाढली, तर भारताला कदाचित रशियावरील अवलंबित्व वाढवावे लागेल, जे आर्थिक बाबतीत भारतासाठी महागडे ठरू शकते.

इस्त्रायल भारताला मौल्यवान खडे, धातू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खते, यंत्रे, इंजिन, पंप आणि तांत्रिक उपकरणे, सेंद्रिय व असेंद्रिय रसायने, मीठ, गंधक, दगड, सिमेंट, प्लास्टिक आदी वस्तू निर्यात करतो.

इस्त्रायल सध्या भारताला ३ अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. युद्ध लांबले तर भारतासोबतचा व्यापार अडचणीत येऊन भारताला किमान २५ हजार कोटींचा फटका आजच्या घडीला बसू शकतो. शिवाय त्याचा भारतातील बाजारपेठेवर परिणाम होऊन दरवाढीची शक्यताही आहेच.

हेही वाचा : 

Back to top button