Israel Hamas War Live Updates :
-इस्रायल आणि हमास युद्धाचा आज (दि.१०) चौथा दिवस आहे. इस्रायलच्या सैन्याने ( Israeli army ) गाझावरील प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत सुमारे १,७०७ ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इस्रायल सैन्याने अनेक मशिदींवर हल्लेही केले आहेत.
– इस्रायलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांचे सुमारे १,५०० मृतदेह सापडले आहेत, असे लष्कराने म्हटले आहे
– गाझा पट्टीच्या उत्तरेकडील दाट लोकवस्तीच्या जबलिया निर्वासित शिबिरावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान १५ लोक ठार झाले आहेत, अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
– इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या थाई नागरिकांची संख्या १८ वर पोहोचली आहे, असे थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
– पॅलेस्टिनींना गाझा सोडून इजिप्तमध्ये जाण्याचा सल्ला इस्रायलच्या लष्कराने दिला आहे.
संबंधित बातम्या
पुढारी ऑनलाईन : गेल्या शनिवारी सुरु झालेले इस्रायल-हमास युद्ध चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले आहे. सोमवारी रात्रभर इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले सुरु ठेवल्याने गाझा पट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायली हवाई दलाने नुकतेच एक अपडेट जारी केले असून, त्यांनी गाझामधील २०० हमास आणि इतर दहशतवादी गटांच्या लक्ष्यांवर रात्रभर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे.
या युद्धातील मृतांचा आकडा आतापर्यंत १६०० वर गेला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील सुमारे ९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायलने गाझावर हल्ले सुरू केल्यापासून पॅलेस्टिनी मधील ७०४ लोक ठार झाले आहेत. (Israel Hamas War Live Updates)