Nobel Prize in Economics | प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर | पुढारी

Nobel Prize in Economics | प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक आज (दि.९) जाहीर करण्यात आले. ‘महिलांचे श्रम आणि क्रयशक्तीचा मार्केटवरील परिणामांचा’ अभ्यास आणि संशोधनासाठी त्यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्काराने जगभरातील महिलांच्या श्रमाचा गौरव करण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२३ च्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची आज अधिकृत घोषणा  केली. (Nobel Prize in Economics)

संबंधित बातम्या:

“‘महिलांचे श्रम आणि क्रयशक्तीचा मार्केटवरील परिणामांची समज वाढवल्याबद्दल” प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांना 2023 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. १९४६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या क्लॉडिया गोल्डिन, या केंब्रिजमधील हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. (Nobel Prize in Economics)

Nobel Prize in Economics : मार्केटमध्ये कमाईत महिला पुरूषांच्या बरोबरीत

या वर्षीच्या इकॉनॉमिक सायन्सेसमधील विजेत्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांनी शतकानुशतके महिलांच्या कमाईचा आणि श्रमिक बाजारातील सहभागाचा पहिला सर्वसमावेशक लेखाजोखा प्रदान केला आहे. विसाव्या शतकात आधुनिकीकरण, आर्थिक वाढ आणि नोकरदार महिलांचे वाढते प्रमाण असूनही, दीर्घ काळासाठी महिला आणि पुरुष यांच्यातील कमाईतील अंतर फारच कमी झाले असून, महिला पुरूषांच्या बरोबरीत आहेत, असे प्रोफेसर क्लॉडिया यांनी अभ्यासातून स्पष्ट करत महिलांच्या श्रमांचे मार्केटमधील स्थान अधोरेखित केले आहे.

गर्भनिरोधक गोळ्याच्या प्रवेशाने महिलांना नवीन संधी उपलब्ध

विसाव्या शतकात, स्त्रियांच्या शिक्षण आणि श्रम ,करण्याची पातळी हळूहळू वाढली. बहुतेक उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये महिलांची शिक्षण आणि श्रमाची पातळी पुरुषांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेत्या प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांनी त्यांच्या संशोधनात असे निदर्शनास आणले की, गर्भनिरोधक गोळ्याच्या प्रवेशाने महिलांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या. यामुळे त्यांच्या शिक्षण आणि श्रम करण्याच्या क्षमतेत क्रांतिकारी बदलाला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळख

एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रोफेसर क्लॉडिया गोल्डिन यांची ओळख आहे. गोल्डिनच्या संशोधनामध्ये महिला कामगार शक्ती, कमाईतील लिंग अंतर, उत्पन्न असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यासह विविध विषयांचा समावेश आहे. त्याचे बरेचसे संशोधन भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तमानाचा अर्थ लावते आणि वर्तमान चिंतेच्या समस्यांचे मूळ शोधते. त्यांनी सर्वात अलीकडे ‘करिअर अँड फॅमिली: अ सेंच्युरी ऑफ वुमन, द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी (प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस, 2021) हे पुस्तक लिहले आहे.

या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाचे  वितरण संपन्न

यापूर्वी शुक्रवारी (दि.) तुरुंगात असलेल्या नर्गेस मोहम्मदी यांना शांततेसाठीचे नोबेल जाहीर करण्यात आले. त्यापूर्वी नॉर्वेचे लेखक, नाटककार जॉन फॉसे यांना साहित्यातील नोबेल (दि.५), अमेरिकन रसायन शास्त्रज्ञ मौंगी जी. बावेंडी, लुईस ई. ब्रुस आणि अलेक्सी. आय. एकिमोव्ह यांना रसायनशास्त्रातील नोबेल (दि.४), पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ आणि ॲने एलहुइलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल (दि. ३), कॅटालिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल (दि.२) जाहीर करण्यात आले. या सर्व नोबेल पारितोषिकांची घोषणा  रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडून करण्यात आली आहे. (Nobel Prizes 2023)

हेही वाचा:

 

 

Back to top button