पुढारी ऑनलाईन डेस्क : नोबेल पुरस्कार समितीने आज (दि.५) साहित्य क्षेत्रातील सन्मानाची घोषणा केली. यंदाचा साहित्यातील नाेबेल पुरस्कार नॉर्वेचे साहित्यिक जॉन फॉसे यांना जाहीर झाला आहे. अनेक नाविन्यपूर्ण नाटक आणि गद्यासाठी त्यांनी दिलेल्या याेगदानाबद्दल त्यांना साहित्यातील सर्वोच्च पारितोषिक जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने केली. (Nobel Prize in Literature 2023)
संबंधित बातम्या:
रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्यावतीने १९०१ पासून आत्तापर्यंत साहित्य क्षेत्रात ११५ नोबेल पारितोषिक देण्यात आले. सन १९०१ ते २०२२ मध्ये ११९ व्यक्तींना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. यामध्ये १७ महिला, ४१ युवक आणि ८८ वयोवृद्ध साहित्यिकांना साहित्यातील नोबेल देण्यात आले आहे. दरम्यान १९१४, १९१८, १९३५, १९४०, १९४१, १९४२, आणि १९४३ या सात वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आले नव्हते. नोबेल फाउंडेशनच्या नियमांनुसार, जर कोणताही शोध निर्धारित निकषांमध्ये बसला नाही, तर परितोषिकाची रक्कम पुढील वर्षापर्यंत राखून ठेवली जाते. पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात कमी नोबेल पारितोषिके देण्यात आली होती, असेही रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी वैद्यकीयशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात आले आहेत. यानंतर आज (दि. ५) नोबेल वितरणाच्या चौथ्या दिवशी साहित्यातील नोबेल जाहीर करण्यात आले आहे. यानंतर उद्या शुक्रवारी (दि.६) शांततेचे नोबेल पारितोषिक आणि शनिवारी (दि.७) अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर करण्यात येणार आहे, असेही स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सने सांगितले आहे.
साहित्य नोबेल विजेते जॉन फॉसे यांचा जन्म नॉर्वेच्या पश्चिम किनारपट्टी भागात झाला. त्यांनी त्यांचे साहित्य नॉर्वेच्या राष्ट्रभाषा असलेल्या नॉर्वेजियन (नायनोर्स्क) मध्ये लिहले आहे. फॉसे यांनी अनेक नाटक, कादंबरी, कविता संग्रह, निबंध, लहान मुलांची पुस्तके त्यांच्या भाषेत लिहले आहेत. तसेच त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद देखील केला आहे. जॉन फॉसे यांनी या वर्षी 'फॉस मिनिमलिझम' ('Fosse minimalism') ही कादंबरी लिहली आहे. तसेच त्याच्या दुसर्या कादंबरी 'स्टेन्ग्ड गिटार' (1985) या कादंबरीमध्ये त्यांनी असंतोषाचा गंभीर क्षण शब्दरूपात मांडला आहे.