Malala Yousafzai : नोबेल शांतता पुरस्‍कार विजेती मलाला युसुफझाई विवाहबद्‍ध | पुढारी

Malala Yousafzai : नोबेल शांतता पुरस्‍कार विजेती मलाला युसुफझाई विवाहबद्‍ध

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

नोबेल शांतता पुरस्‍कार विजेती मलाला युसुफझाई ( Malala Yousafzai ) ही विवाहबंधनात अडकली आहे. बर्मिंगहॅममध्‍ये एक साध्‍या समारंभात तिने असर याच्‍यासोबत लग्‍न केले. सोशल मीडियावर पोस्‍ट करुन मलालाने याची माहिती दिली.

पोस्‍टमध्‍ये २४ वर्षीय मलाला युसुफझाई ( Malala Yousafzai ) हिने म्‍हटले आहे की, बिर्मिंगहॅममध्‍ये एका साध्‍या कार्यक्रमात कुटुंबीयांच्‍या उपस्‍थित असर आणि मी विवाहबद्‍ध झालो आहोत. आता मी एक विवाहित महिला आहे. आजचा दिवस माझ्‍या आयुष्‍यातील विशेष दिवस आहे. मी आणि असर पुढील आयुष्‍यात एकत्रीत वाटचालीसाठी उत्‍साहित आहोत, असेही तिने नमूद केले आहे. मलालाने विवाहाचे चार फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्‍ये ती पति असरसह आपल्‍या आई-वडील झियाउद्‍दीन युसुफझाई आणि पेकाई युसुफझाई यांच्‍यासोबत दिसत आहे.

( Malala Yousafzai ) मुलींच्‍या शिक्षण हक्‍कांसाठी लढणारी मलाला

मलाला ही मूळची पाकिस्‍तानमधील स्‍वात खोर्‍यातील रहिवासी. ११ वर्षांची असताना मलालाने मुलींच्‍या शिक्षणावर प्रथम भाष्‍य केले होते. तसेच मुलीचा जन्‍मानंतर उत्‍सव केला जात नाही, असे सूचक विधान केल्‍यामुळेही पाकिस्‍तानमध्‍ये चर्चेत आली होती. २०१२मध्‍ये शाळेला जात असताना तालिबान्‍यांनी मलाला वर गोळीबार केला होता. यामध्‍ये गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी ब्रिटनमध्‍ये नेण्‍यात आले.

शस्‍त्रक्रियेनंतर मलाला बरी झाली. यानंतर तिने संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मुख्‍यालयात ‘मुलीच्‍या शिक्षणाची आवश्‍यकता’ या विषयावर केलेले भाषणाची जगभर प्रशंसा झाली. मलालावर हल्‍ला झाल्‍यानंतर पाकिस्‍तानमध्‍ये मुलींसाठी शिक्षणाच्‍या अधिकार कायदाही करण्‍यात आला होता. मलालाने तिच्‍यावर झालेल्‍या हल्‍ला आणि त्‍याचे झालेल्‍या परिणामावर ‘आई एम मलाला’ आत्‍मचरित्रही खूप गाजले. २०१४ मध्‍ये मलाला नोबेल शांतता पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले होते. नोबेल पुरस्‍काराने सन्‍मान होणारी ती जगातील सर्वात तरुण व्‍यक्‍ती आहे.

 

हेही वाचलं का?

 

 

Back to top button