युक्रेनी मुलांसाठी रशियन पत्रकाराने केला नोबेल पुरस्काराचा लिलाव

नोबेल
नोबेल

मॉस्को : वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांना परागंदा व्हावे लागले आहे. यामध्ये मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या मुलांच्या मदतीसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आता या मुलांसाठी खुद्द रशियाचा पत्रकारच पुढे सरसावला आहे. नोवाया गजेटा या वृत्तपत्राचे मुख्य संपादक दिमित्री मुराटोव्ह यांनी युक्रेनी मुलांच्या मदतीसाठी नोबेल पुरस्काराचा लिलाव केला आहे.

हा लिलाव न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात पार पडला. एका अनोळखी खरेदीदाराने हा पुरस्कार 10.35 कोटी डॉलर्सला खरेदी केला. 2021 मध्ये फिलीपाईन्सचे पत्रकार मारिया रसा आणि मुराटोव्ह यांना संयुक्‍तपणे शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुराटोव्ह रशियात दीर्घकाळापासून अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यासाठी काम करत होते. 1993 मध्ये त्यांनी नोवाया गजेटा या वृत्तपत्राची स्थापना केली. काही वर्षांतच हे वृत्तपत्र देशात आणि विदेशात पुतीन यांच्यावर टीका करणारे एकमुखी वृत्तपत्र ठरले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news