अफगाणितानातून माघार घेण्यास ट्रम्प जबाबदार | पुढारी

अफगाणितानातून माघार घेण्यास ट्रम्प जबाबदार

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अफगाणिस्तानातून माघार घेण्यास माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने केला आहे. सरकारकडून जारी केलेल्या 12 पानांच्या अहवालात म्हटले आहे की, तालिबान आणि अमेरिकन लष्कर माघार घेण्याचा घेतलेला निर्णय बायडेन यांनी मजबुरीने घेतला होता. 2020 मध्ये ट्रम्प सरकार आणि तालिबानमध्ये झालेल्या करारामुळे बायडेन यांचे हात बांधले गेले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातून पहिल्यांदा नागरिकांना बाहेर काढण्यास प्राधान्य द्यायला हवे होता. ट्रम्प प्रशासनाचे दुर्लक्ष आणि काही प्रकरणात जाणिवपूर्वक अफगाणिस्तानातून माघार घेतली होती.

2020 मध्ये ट्रम्प आणि तालिबान यांच्यात कतारमध्ये एक करार झाला होता. यानुसार अफगाणिस्तानात युद्धबंदी आणि अमेरिकन लष्कर माघार घेण्यावरून सहमती झाली होती. याचदरम्यान हजारो तालिबानी कैद्यांना तुरुंगातून सुटका केली होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून बायडेन सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, व्हाईट हाऊसमध्ये बसलेल्या मुर्ख लोकांनी चूक माहिती देऊन नवीन खेळ सुरू केला आहे. त्याचे नाव आहे ब्लेम ट्रम्प!

Back to top button