चीनमध्ये आता कुमारी मुलींना मातृत्व धारण करण्याची परवानगी | पुढारी

चीनमध्ये आता कुमारी मुलींना मातृत्व धारण करण्याची परवानगी

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमध्ये वृद्धांची संख्या वाढत चाललेली आहे. नवी पिढी मुले जन्माला घालायला उत्सुक नाही. ‘एक अपत्य धोरण’ सरकारने शिथिल केल्यानंतरही जोडपी अधिक मुले जन्माला घालायला तयार नाहीत. युवा लोकसंख्या वाढविण्यासाठी चीनमध्ये आता तरुणींना लग्न न करता ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून मातृत्व धारण करण्याची परवानी देणारा कायदा चीनमधील जिलीन राज्य सरकारने केला आहे.

चीनच्याच हेबेई राज्यात महिलांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन द्यावे म्हणून महिला सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हुनान राज्यातील एका जिल्ह्यात चक्क ‘ऑपरेशन बेड वॉर्मिंग’ सुरू करण्यात आले आहे.

परगावी शिक्षण, नोकरीस बंदी; लग्न करा, इथेच राहा!

‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून निवडण्यात आलेल्या हुनानच्या या जिल्ह्यात मुलींना शिक्षण तसेच नोकरीसाठी मोठ्या शहरांत जाण्याचे स्वातंत्र्य नसेल. स्थानिक मुलांशी लग्न करणे, या मुलींवर बंधनकारक करण्यात आले आहे. लग्न हा व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय नाही. समाजाच्या विकासासाठी नव्या पिढीचे ते कर्तव्य आहे, असे या योजनेच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

 

Back to top button