Johnny Depp gives tip : भारतीय जेवणाची लज्जतच न्यारी…हॉलीवूड अभिनेत्‍याने वेटरला दिली तब्‍बल ४९ लाखांची टिप! | पुढारी

Johnny Depp gives tip : भारतीय जेवणाची लज्जतच न्यारी...हॉलीवूड अभिनेत्‍याने वेटरला दिली तब्‍बल ४९ लाखांची टिप!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

तुम्‍ही हॉटेलमध्‍ये जाता. मनसाेक्‍त खाता. यावेळी तुम्‍हाला जेवण वेटरने चांगलं सर्व्ह केले असेल तर तुम्‍ही त्‍याला टिपही देता;पण टिप किती द्‍यावी हेही व्‍यक्‍ती आणि त्‍याच्‍या व्‍यवसायानुसार ठरतं. आता हॉलीवूडचा अभिनेता जॉनी डेप ( Johnny Depp gives tip ) हा आपल्‍या मित्रांसमवेत ब्रिटनमधील भारतीय रेस्‍टॉरंटमध्‍ये जेवणासाठी गेला. यावेळी त्‍याने भारतीय जेवणाचा मनसोक्‍त आस्‍वाद घेतला. त्‍याला भारतीय जेवणाची चव एवढं आवडलं की, त्‍याने सर्व्ह करणार्‍या वेटरला तब्‍बल ४९ लाख रुपये टिप दिली.

मागील काही आठवडे हॉलीवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्‍याची पूर्वपत्‍नी एंबर हर्ड यांच्‍यातील न्‍यायालयीन संघर्ष सुरु होता. तो नुकताच संपला आहे. मानहानीचा खटला जॉनी डेप जिंकला असून, एंबरला तब्‍बल ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिला आहे. खटल्‍या जिंकल्‍यापासून जॉन डेप भलताच खूष आहे. त्‍याच्‍या देहभोलीवरुन तो आपला कायदेशीर विजयाचा आनंद साजरा करत असल्‍याचे दिसत आहे.

Johnny Depp gives tip : पाहुणचाराने जाॅनी भारावला

खटला जिंकल्‍यानंतर जॉनी डेप हा आपला साथीदार जेफ बेकबरोबर भटंकती करत आहे. सध्‍या तो इंग्‍लंड आहे. नुकताच तो आपल्‍या मित्रांसमवेत बर्मिंगहॅम येथील भारतीय खाद्‍यपदार्थांसाठी प्रसिद्‍ध असणार्‍या ‘वाराणसी रेस्‍टॉरंट’ जेवणासाठी गेला हाेता. यावेळी रेस्‍टॉरंटच्‍या मालक व कर्मचार्‍यांनी त्‍याचे व त्‍याच्‍या टीमचे भव्‍य स्‍वागत केले. यावेळी त्‍यांनी भारतीय खाद्‍यपदार्थांचा मनमुराद अस्‍वाद घेतला. जॉनी डेपला भारतीय जेवण एवढे आवडलं की, त्‍याने आपल्‍या सोबत पार्सलही घेतले.

जॉनी डेपला रेस्‍टॉरंटमधील जेवण आणि पाहुणचार एवढा आवडला की, त्‍याने डिनरनंतर रेस्‍टॉरंटमधील कर्मचार्‍यांची भेट घेतली. रेस्‍टॉरंटच्‍या मालकाच्‍या तीन मुलींनाही तो भेटला. यावेळी त्‍याने आपल्‍या चित्रपटातील लोकप्रिय डॉयलॉगही उपस्‍थितांना सुनावले. यानंतर वेटरला ४९ लाख रुपयांची टीपही दिली, अशी माहिती रेस्‍टॉरंटच्‍या प्रवक्‍त्‍यांनी दिली. सध्‍या जॉनीने ‘वाराणसी रेस्‍टॉरंट’मध्‍ये दिलेल्‍या टिपची चर्चा ब्रिटनसह हॉलीवूडमध्‍ये रंगली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button