Anil Ambani Black Money : ‘दिवाळखोर’ अनिल अंबानींची परदेशात ८०० कोटींची अघोषित संपत्ती : आयकर विभागाची नोटीस

Anil Ambani Black Money : ‘दिवाळखोर’ अनिल अंबानींची  परदेशात ८०० कोटींची अघोषित संपत्ती : आयकर विभागाची नोटीस
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती अनिल अंबानी यांना अघोषित अशा ८०० कोटीच्या मालमत्तेसंदर्भात काळा पैसा कायद्यातील तरतुदींनुसार नोटीस काढण्यात आली आहे. मुंबई आयकर विभागाने ही नोटीस काढली आहे. विदेशांतील मालमत्तासंदर्भात ही नोटीस जाहीर करण्यात आली आहे. (Anil Ambani Black Money)

या संदर्भातील बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. आयकर विभागाने त्यांना काढलेल्या नोटीसत त्यांच्या विदेशातील संपूर्ण व्यवहारांचा तपशिल असून या व्यवहारांची भारतीय मुल्यांतील किंमत ८०० कोटी इतकी आहे. विशेष म्हणजे २०२० अनिल अंबानी यांनी २०२०ला ब्रिटनमधील कोर्टात दिवाळखोरी जाहीर केलेली आहे. तसेच आपली नेटवर्थ शून्य असल्याचेही त्यांनी म्हटले होते. (Anil Ambani Black Money)

या नोटीसमध्ये अनिल अंबनी यांची बहामास आणि ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमध्ये गुंतवणूक दाखवण्यात आली आहे. बहामास येथे अनिल अंबानी यांनी २००६ला डायमंड ट्रस्ट सुरू केला होता. ड्रिमवर्कस होल्डिंगच्या इनकॉर्पोरेशनच्या माध्यमातून हा ट्रस्ट सुरू करण्यात आला होता. तर २०१०ला ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमध्ये एक कंपनी सुरू केली होती. या कंपनीचे बँक ऑफ सायप्रसमध्ये खाते आहे. या कंपनींचा उल्लेश पँडोरा पेपर्समध्येही आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news