स्वातंत्र्यसंग्रामातील ‘त्या’ कृत्याबद्दल माफी मागण्यास इंग्लंडचा नकार | पुढारी

स्वातंत्र्यसंग्रामातील ‘त्या’ कृत्याबद्दल माफी मागण्यास इंग्लंडचा नकार

लंडन : प्रतिनिधी

लंडनचे महापौर सादिक खान यांनी केलेली मागणी फेटाळून लावत जालियनवाला बाग गोळीबार प्रकरणात माफी मागणार नसल्याचे इग्लंडने स्पष्ट केले आहे. जालियनवाला बागमध्ये ब्रिटीशांनी जो गोळीबार केला त्यात शेकडे लोकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे इग्लंडने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी सादिक खान यांनी केली होती. दरम्यान, सादीक खान यांच्या मागणीला इग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने नकार देत माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी चार वर्षांपूर्वी केलेल्या विधानाचा पुनरूच्चार केला.

इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी  2013 मध्ये जालियनवाला बागचा दौरा केला होता. या वेळी ही घटना इग्लंडच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी आणि तितकीच क्रूर घटना होती. जी कधीही विसरली जाणार नाही असे म्हंटले होते. या घटनेत ज्यांचे प्राण गेले त्यांचा आम्ही आदर करतो असे म्हणाले होते.

Back to top button