पाककडून अफगाणिस्तानात आग लावण्याचे काम : हक्कानी | पुढारी

पाककडून अफगाणिस्तानात आग लावण्याचे काम : हक्कानी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अफगाणिस्तानमध्ये सध्या विविध मुद्द्यांवर अस्थिर परिस्थिती आहे. या अस्थिर परिस्थितीमध्ये आग लावण्याचे काम पाकिस्तानकडून होत आहे. हे दुर्दैवी  आहे. असा पोलखोल खुद्द पाकिस्तानच्या एका माजी सनदी अधिकार्‍याने केला आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी हे मत व्यक्त केले आहे. 

ते म्हणाले, अफगाणिस्तानमध्ये चांगली लोकशाही यंत्रणा आणण्याचे अमेरिका प्रयत्न करत आहे. येथून आपले सैन्य मागे घेण्यापूर्वी अफगाणिस्तानला सक्षम करण्यावर अमेरिकेचा भर असणार आहे. कारण तालिबानकडून होणार्‍या वारंवार हल्ल्यांना तोंड देण्याची क्षमता अफगाणिस्तानमध्ये निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. मात्र, याला खोडा घालण्याचे काम पाकिस्तान करत आहे.

कारण पाकिस्तनची सेना एका बाजूला तालिबानला पोसत आहे, तर दुसर्‍या बाजूला पाकिस्तान सरकार आम्ही दहशतवादविरोधी लढाईत अमेरिकेसोबत आहे असे सांगत आहे. या माध्यमातून पाकिस्तान नेहमी आग लावण्याचेच काम करत आहे; पण आग विझविण्याचेही काम झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

Back to top button