Pompeii : २० हजार माणसं जागच्या जागी दगडांत रुपांतरीत झाली !!! | पुढारी

Pompeii : २० हजार माणसं जागच्या जागी दगडांत रुपांतरीत झाली !!!

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : तुम्ही वितळलेला लालबुंद लाव्हारस पाहिला आहे का? तुम्ही एखादी वस्तू त्या लालबुंद लाव्हारसात वितळून गेलेली पाहिली आहे का? थोडासा विचार करा की, २००० वर्षांपूर्वी अचानक एक अख्खं शहर (Pompeii) लाव्हारसामध्ये गाडून गेलंय आणि त्यावेळी लोकांना सावरण्यासाठी वेळ मिळाला नाही. भलेही ती माणसं असतील किंवा जनावरं. या महाभयंकर ज्वालामुखीच्या मार्गामध्ये जो कोणी आला तो लाव्हारसात गाडला गेला. वाचले ते फक्त गाढ झोपेत असणारे मुडदे. आज आपण जाणून घेणार आहोत ‘त्या’ शहराबद्दल. ज्या शहरातील जिवंत माणसं एका क्षणात दगडांच्या मूर्तींमध्ये परिवर्तित झाली. ही गोष्ट ऐकायला तुम्हाला विचित्र वाटेल. पण, हे पूर्णतः सत्य आहे की, या शहरातील जिवंत माणसं क्षणात दगड्यांच्या मूर्तींमध्ये कैद झाली.

या शहराचं नाव आहे पोम्पी (Pompeii). तत्कालिन काळात इटलीतील छोटंस शहर म्हणून पोम्पी शहराची ओळख होती. हे शहर छोटंसं असलं तरी, इटलीसाठी या शहराचं महत्व खूप होतं. आजच्या आधुनिक शहरांना लाजवतील, अशी अत्याधुनिक रचना पोम्पी शहराची होती. या शहराचं उत्खनन झालं, तेव्हा संशोधकांचे डोळे विस्फारले.

pompeii

योग्य जलव्यवस्थापन आणि भरपूर व्यायामशाळांची निर्मिती पोम्पी शहरात करण्यात आली होती. तेथील बंदरं पाहिली की लक्षात येतं… पोम्पी शहारातील लोक समुद्रमार्गे व्यापार करत असतं. या शहरातील लोक सभ्य जगणं जगत होते, त्यामुळेच की काय पोम्पी इटलीतील सर्वात महत्वाचं शहर होतं.

२००० वर्षांपूर्वी इतकं आधुनिक असणारं शहर… जेव्हा इसवी सन ७९ व्या शतकात माऊंट व्हेसुव्हियसच्या ज्वालामुखीचा महाभयंकर विस्फोट झाला तेव्हा हे शहर तप्त अशा लाव्हारसात गाडलं गेलं.

माऊंट व्हेसुव्हियस ज्वालामुखी हा जागृत ज्लालामुखी होता. पण, भूतकाळात तो भलेही बाहेर आला नसेल.पण, वर्ममानकाळात कधीही त्याचा स्फोट होऊ शकतो. कदाचित पोम्पी शहरातील रहिवाशांना त्याची कल्पना नसावी. त्यामुळेच त्यांच्या लक्षातही आलं नाही की, या तप्त लाव्हारसात कधी त्यांचा मृत्यू झाला. म्हणून पोम्पी शहरातील भयंकर घटना ऐकली की आजही अंगावर काटा येतो.

या भयानक घटनेसंबंधी असं सांगितलं जातं की, जेव्हा या ज्वालामुखीचा स्फोट झाला. तेव्हा पोम्पी शहरावर धूर आणि राखेचं वादळ उठलं. पृथ्वीच्या पोटातून निघालेला लाव्हासर शहराच्या दिशेने वेगाने सरकत होता. हा ज्वालामुखीचा स्फोट इतका भयंकर होता की, १० किलोमीटर परिसरावर त्याचा परिणाम झाला होता.

pompeii

या लाव्हारसाच्या मगरमिठीत सापडले होते पोम्पी शहरातील निष्पाण लोक आणि पाळीव जनावरं. असं सांगितलं जातं की, जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा शहारातील तापमान तब्बल २५० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं होतं.

अशा तापमानात जरी कोणी आपल्या घरात बसलेला असला तरी, त्याचा जीव वाचणारच नव्हता. त्यामुळे हे क्षणात पोम्पी शहर जिवंत माणसांच्या मुडद्यांमध्ये परावर्तित झालं.

कुणालाही माहिती नाही की ज्यावेळी ही घटना घडत होती, तेव्हा या शहरातील (Pompeii) माणसांची हालचाल कशा होत्या. त्यावेळी नेमकं काय करत होते? थोडीशी कल्पना येते तोपर्यंत तप्त लाव्हारसाने त्यांना आपल्या मिठीत घेतलं. पोम्पी शहरातील तब्बल २० हजार लोक ज्वालामुखीमध्ये गाडलेले आढळून आले.

आजही काही मुडदे संशोधकांना सापडतात. माणसांचं शरीर दगडांच्या मूर्तीमध्ये बदलेलं पाहून संशोधक त्यावेळेच्या परिस्थितीचा अंदाज बांधतात. या दगडांमध्ये परावर्तित झालेल्या मुडद्यांना पाहून असा अंदाज लावला जातो की, घटना घडत असताना शहारातील लोक झोपेत असावेत. कदाचित त्यातील एका व्यक्तीला या भयानक घटनेची कल्पना आली असावी.

त्यामुळे तो बाकीच्या झोपलेल्या सहकाऱ्यांना उठवण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत असावा. पण, त्याचा तो क्षण एका निर्जीव पुतळ्यात कैद झाला. काही जण आपल्या लाडक्या मुलांशी खेळत असावेत, काही जण तप्त लाव्हारसाकडे पाहून स्वतःच्या मुलाला त्यापासून वाचण्यासाठी कुशीत घेऊ वाचविण्याचा प्रयत्न करत असावेत.

pompeii

त्यावेळी प्रत्यक्ष लाव्हा आपल्या अंगावर सांडताना पोम्पी शहरातील लोकांची अवस्था काय झाली असेल, याचा अंदाज आपण लावू शकत नाही. पोम्पीमध्ये वाढलेल्या तापमानामुळे तेथील प्रत्येक प्राण्यांच्या फुफ्फुसांना जाळून काढले होते आणि शरीरातील मांसपेशी वितळवून टाकल्या होत्या.

लेखक, तत्वज्ञ आणि आर्मी कंमाडर असलेले प्लिनी डायल्टन जेव्हा समुद्र मार्गाने प्रवास करीत असताना पोम्पी शहरापासून जात होते, तेव्हा त्यांना ही महाभयंकर घटना दिसली. कशाचाही विचार न करत प्लिनी डायल्टन यांनी आपलं जहाज पोम्पी शहारातील (Pompeii) माणसांना वाचविण्यासाठी पुढे आणले.

पण, तप्त अशा ज्वालामुखीचं तापमान इतकं होतं की, ते स्वतः त्यात फसले आणि त्यांचा मृत्यू झाला. प्लिनी यांनी जेव्हा समुद्रातून ही घटना पाहिली तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यात या घटनेचं वर्णन सापडतं. शास्त्रज्ञांचं मत आहे की, जेव्हा या शहराचं उत्खनन करण्यात आलं तेव्हा जमिनीत १३२० फूट आतमध्ये त्यांना मानवी सांगाड्यांचे दगडी अवशेष आढळून आले.

हे अवशेष फक्त हाडांच्या स्वरुपात होते. तब्बल १५०० वर्षे जमिनीत गाडलेल्या पोम्पी शहराचा कुणालाही मागमूस नव्हता. या शहराचा शोध १५९९ मध्ये लावण्यात आला. त्या संशोधनात जगासमोर आलं की, पोम्पी शहर हे तत्प ज्वालामुखीच्या राखेत सामावून गेलं आहे.

पाहा व्हिडीओ : रहस्या अंबाबाई मंदिरात मणकर्णिका जलकुंडाचे !

Back to top button