Mount Everest : माऊंट एव्हरेस्टवर आहेत इतक्या डेडबाॅडीज! | पुढारी

Mount Everest : माऊंट एव्हरेस्टवर आहेत इतक्या डेडबाॅडीज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) जसा धाडसीवीरांसाठी यशाचं शिखर ठरला आहे. तसाच तो काही धाडसीवीरांसाठी मृत्यूचं शिखर ठरला आहे. खूप जणांनी माऊंट एव्हरेस्टवर चढाई करून रेकाॅर्ड केला आहे, तर या पर्वताने स्वतः अनेक जणांचा प्राण घेऊन नवा रेकाॅर्ड केला आहे. इथं जाणं म्हणजे मृत्यूला चॅलेंज देण्यासारखं आहे.

मृत्यूला चकवा देऊन या पर्वतावर चढाई करू शकतो, असं इथं जाणाऱ्या प्रत्येकाला वाटतं. माऊंट एव्हरेस्टवर सर्वांत पहिल्यांदा चढाई करणाऱ्या व्यक्तींपैकी जाॅर्ज मॅलोरी एक होते. त्यांना असं विचारण्यात आलं होतं की, “तुम्हाला माऊंट एव्हरेस्ट का सर करायचा आहे?” त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं की, “कारण, ते तिथं आहे.” नंतर जाॅर्ज मॅलोरी यांची बाॅडी या पर्वतावर ७५ वर्षांनी सापडला होता.

Dead Bodies

माऊंट एव्हरेस्टवर आतापर्यंत किती डेडबाॅडीज सापडल्या?

सध्या असा अंदाज लावला जातो आहे की, माऊंड एव्हरेस्टवर २०० च्या आसपास डेडबाॅडीज असतील. या भयानक पर्वतावर या बाॅडीज कुठे असतील, याचा कोणताही मागमूस लागत नाही. असं सांगितलं जातं की, एकूण बाॅडीजपैकी ६५ टक्क्यांहून अधिक बाॅडीज या पर्वतांवरत विखुरल्या आहेत.

एव्हरेस्टवर चढाई करताना कितीजण मृत्यूमुखी पडले?

जानेवारी २०२१ पर्यंत ३०५ लोक माऊंट एव्हरेस्टवर चढाई करताना मृत्यू पावलेले आहेत. यापैकी बहुतेक बाॅडीज या तिथं पर्वतावरच आहेत. यातील बहुतांशी बाॅडी अजूनही सापडलेल्या नाहीत. जेव्हा हवामानात बदल होतो, तेव्हा या डेडबाॅडीज बर्फातून उघड्या पडतात. पण, या डेडबाॅडीज मागूर पर्वत सर करणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरतात.

आतापर्यंत किती जणांना एव्हरेस्ट चढाई यशस्वी केली आहे?

जानेवारी २०२१ पर्यंत १० हजार १८४ लोकांनी माऊंट एव्हरेस्टवर यशस्वीपणे चढाई केलेली आहे. यामध्ये काहींनी ग्रुपने तर, काहींना वैयक्तिकरित्या चढाई केलेली आहे. वैयक्तिक चढाई करणाऱ्यांची संख्या ५ हजार ७३९ इतकी आहे. पर्वतावर मृत्यू होणाऱ्यांची तुलना केली की, केवळ ३ टक्के आहे. अर्थात २० लोकांपैकी केवळ एका व्यक्तीचा मृत्यू होत असतो.

माऊंट एव्हरेस्ट

जीवघेण्या माऊंट एव्हरेस्टवर लोक का जातात?

जगातल्या सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या १४ पर्वतांपैकी माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) हा एकमेव पर्वत आहे, जो समुद्र सपाटीपासून तब्बल ८ हजार मीटर उंच आहे. इतक्या उंच पर्वत चढून जाणे, सामान्य माणसाला शक्यच नाही. विशेष करून ज्यांना हृदयविकार आणि छातीचे आजार यांनी तरी तिथं जाण्याचं नावच काढून नये.

यावर चढाई करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या माणूस तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. समुद्र सपाटीपासून ८ हजार ८४८. ८६ मीटर किंवा २९ हजार १२९ फूट उंच असणारा हा पर्वत जगात सर्वात उंच असा आहे. या पर्वतावर यशस्वी चढाई करणं, ही बाब बातमीचा विषय ठरते.  माऊंट एव्हरेस्टवर मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असते.

पहा व्हिडीओ : सफर अलंग, मदन, कुलंग किल्ल्यांची…

या इंटरेस्टिंग स्टोरीज वाचला का?

Back to top button