डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर केएफसीची टीव-टीव | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर केएफसीची टीव-टीव

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियावर विविध उत्पादने करणाऱ्या कंपन्या आपली क्रिएटिव्हीटी दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाद म्हणून चर्चेत असलेल्या ‘टेबलावरील अणुबॉम्बच्या बटना’ची खिल्ली उडवणारे एक ट्विट फास्टफूड चेन कंपनी असलेल्या ‘केएफसी’ने केले आहे. यामध्ये त्यांनी अणुबॉम्ब ऐवजी बर्गरच टेबलावर ठेवला आहे. 

‘मेकडॉनल्डसचे प्रमुख रॉनल्ड यांनी म्हटले आहे की माझ्या टेबलवर नेहमी एक बर्गर असतो. कोणीतरी फुगलेल्या लाल नाकाच्या साम्राज्याच्या राजाने सांगावे की माझ्याकडे त्यापेक्षाही मोठा बर्गर आहे. पण माझ्याकडे एक बर्गर मील बॉक्स आहे, जो त्याहीपेक्षा अधिक महाशक्तिशाली आहे आणि त्यामध्ये जास्त ग्रेव्ही देखील आहे’ असे ट्विट केएफसीने ३ जानेवारी रोजी केले आहे. 

 

या ट्विटमधून केएफसीने प्रतिस्पर्धी असलेल्या ‘मेकडॉनल्डस’वर निशाणा साधला आहे. केएफसीचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. या ट्विटला १ लाखांपेक्षाही अधीकवेळा रिट्विट केले गेले आहे.

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोग यांनी अणुबॉम्बचे बटन माझ्या टेबलावर आहे, असे विधान करून अमेरिकेला खुले आव्हान दिले होते.किम जोंग यांनी केलेल्या या विधानावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटवार केला होता. माझ्या टेबलावर अणुबॉम्बचे सर्वात मोठे बटन असून हे बटन महाशक्तिशाली आहे, असा सणसणीत टोला त्यांनी ट्विटरवरून लगावला होता.

 

Back to top button