दारुच्या नशेत एका रात्रीत फिरला तीन देश  | पुढारी

दारुच्या नशेत एका रात्रीत फिरला तीन देश 

ओस्लो (नॉर्वे) : पुढारी ऑनलाईन 

दारु पिल्यावर माणसाचा काही भरोसा नसतो अस म्हणतात. दारुच्या नशेत माणूस काहीही करतो. याचाच एक अनुभव नुकताचा ३१ डिसेंबरला आला. या दिवशी जगभरात वर्षाच्या इतर दिवसांच्या तुलनेत बऱ्याच अधिक प्रमाणात दारुचे सेवन केले जाते. असाच एक अजब किस्सा युरोप मधील नॉर्वे देशात घडला. 

नॉर्वे देशातील ओस्लो शहरातील एक माणूस ३१ डिसेंबरला भरपूर दारु प्यायला. दारुच्या नशेतच त्याने टॅक्सी केली. त्याने टॅक्सी चालकाला तीन देशातून फिरवून आण असे सांगितले. त्या टॅक्सी चालकानेही त्याला डेन्मार्क मधील कोपनहेगन, स्विडन आणि शेवटी नॉर्वेच्या ओस्लो मध्ये सोडले. या प्रवासाला सहा तास लागले आणि त्याचे बील १८,०० नॉर्वेयन क्रोनर (२,२२० डॉलर) इतके झाले. 

तीन देशांची सफर झाल्यानंतर ते ओस्लो शहरात आले. त्यानंतर टॅक्सी चालकाने त्याला झालेले बील सांगितले. पण, त्या व्यक्तीने बील देण्यास चक्क नकार दिला. टॅक्सी चालकाला नाईलाजास्तव पोलिसांना बोलवले. त्यानंतर त्या व्यक्तीने टॅक्सीचालकाचे पैसे देण्यास होकार दिला. हा सर्व किस्सा ओस्लो पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 

Back to top button