अमेरिकेची नरमाई: किम जोंगशी चर्चा करण्यास तयार  | पुढारी

अमेरिकेची नरमाई: किम जोंगशी चर्चा करण्यास तयार 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनर्लान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्‍तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यात गेल्‍या अनेक दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. मात्र, आता ट्रम्‍प यांनी थोडी नमाईची भूमिका घेतली आहे. किम जोंग यांच्यासोबत फोनवरून चर्चा करण्यास तयार  असल्‍याचे ट्रम्‍प यांनी सांगितले आहे. 

उत्‍तर कोरियाकडून सतत होत असलेल्‍या क्षेपणास्त्र चाचणीबाबत अमेरिका नाराज आहे. त्‍यावरून ट्रम्‍प आणि जोंग यांच्यामध्ये  शाब्‍दिक चकमक सुरु आहे.  आपल्‍या हातात अणुबॉम्बचे बटन आहे असे म्‍हणत गेल्‍या आठवड्यात जोंग यांनी अमेरिकेला धमकी देण्याचा प्रयत्‍न केला होता. मात्र, आपल्‍या टेबलावर सर्वात मोठ्या अणुबॉम्‍बचे बटन काम करत असल्‍याचे ट्वीट करत ट्रम्‍प यांनी जोंगला उत्‍तर दिले होते. 

उत्‍तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या चर्चेतून सकारात्‍मक मार्ग निघणार असेल तर, मी जोंग यांच्याशी फोनवरून चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी मला काहीच अडचण नाही. असे ट्रम्‍प यांनी म्‍हटले आहे. 

उत्तर कोरियाने  पुढील आठवड्यात दक्षिण कोरियाबरोबर अधिकृत चर्चा करण्यास शुक्रवारी मान्यता दिली. दोन वर्षानंतर या दोन्ही देशांमध्ये चर्चा होत आहे. 

Back to top button