अद्भुत; शस्त्रक्रिया करून बाळ पुन्हा गर्भाशयात | पुढारी

अद्भुत; शस्त्रक्रिया करून बाळ पुन्हा गर्भाशयात

टेक्सास : पुढारी ऑनलाईन

विज्ञानामध्ये चमत्काराला स्थान नसते. पण वैद्यकीय क्षेत्रात अनेक वेळा अशा गोष्टी घडतात ज्याविषयी वाचल्यानंतर आपल्याला त्या चमत्कारिक वाटतात. वैद्यकीय क्षेत्रातच अशी एक अद्भुत घटना घडली आहे. मुळच्या नायजेरियन असलेल्या एका डॉक्टरने आईच्या गर्भातून भ्रूण बाहेर काढून त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर भ्रूण पुन्हा गर्भात ठेवले. या शस्त्रक्रियेनंतर 36 आठवड्यांनी बाळाने जन्म घेतला. 

अमेरिकेतील टेक्सास येथील एका रुग्णालयात ही अनोखी शस्त्रक्रिया झाली आहे. एका महिलेच्या पोटात असलेल्या बाळाला ट्यूमर असल्याचे स्कॅनिगमध्ये आढळले. बाळ पोटात असतानाच ट्यूमर सारखा जीवघेणा आजाराचे निदान झाल्यामुळे काळजीचे वातावरण होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने गर्भातील भ्रूणावर ऑपरेशन करून ट्यूमर काढण्याचा निर्णय घेतला.  

रुग्णालयातील डॉक्टरांच्या विशेष पथकाने गर्भातील भ्रूण बाहेर काढून त्यावर ऑपरेशन केले आणि भ्रूण पुन्हा आईच्या गर्भात ठेवले. अगदी चमत्कारिक वाटेल अशा या ऑपरेशननंतर 36 आठवड्यांनी आईने बाळाला जन्म दिला. 

शिक्षिका आणि संशोधक असलेल्या जेमीशाने या घटनेबद्दल ट्विट केले आणि अपेक्षेप्रमाणे तिची पोस्ट व्हायरल झाली. जेमीशाची ही पोस्ट जवळ जवळ 90 हजार वेळा रिट्विट झाली आहे. तर 2 लाख 53 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे. जेमीशाने या पोस्टमध्ये ही शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरसह आई आणि बाळाचा फोटो शेअर  केला आहे.

Image may contain: 3 people, people smiling, text

Back to top button