जागतिक पर्यावरण दिन : फाशीचा डोंगर ते जैवविविधता वन व्हाया ‘देवराई’; घनदाट वृक्षांनी तापमानात घट

नाशिक : "देवराई २०२४" आज देवराई अशी हिरवीगार झालेली पहावयास मिळत आहे.
नाशिक : "देवराई २०२४" आज देवराई अशी हिरवीगार झालेली पहावयास मिळत आहे.
Published on
Updated on

[author title="नाशिक : नील कुलकर्णी" image="http://"][/author]
कधी काळी फाशीचा डोंगर अशी नकारात्मक ओळख असलेला, सातपूर येथील वनविभागाच्या अख्यत्यारीत निरुपयोगी गिरीपुष्प (ग्लॅरीसिडीया) झाडांमुळे नापीक झालेल्या टेकडीवर ग्रीन मॅन शेखर गायकवाड आणि त्यांच्या 'आपलं पर्यावरण'ने २८ हजार वृक्षलताचे समृद्ध जंगल फुलवून येथील प्रदेश जैवविविधेतेच समृद्ध आगार केले आहे.

देवराई : २०१५ मध्ये तत्कालीन 'फाशीचा डोंगर' असा ओसाड, रुक्ष होता..
देवराई : २०१५ मध्ये तत्कालीन 'फाशीचा डोंगर' असा ओसाड, रुक्ष होता..

२०१५ पूर्वी सातपूरचा फाशीचा डोंगर नावाने ओळखला जाणाऱ्या टेकडीवर वनविभागाने गिरीपुष्पसारखी वृक्ष लावले आणि हा परिसर ओसाड, नापीक झाला. अशा ठिकणी जंगलाला पुनर्जीवन द्यायाचे आव्हान होते. या टेकडीला दत्तक घेऊन शेखर गायकवाड यांनी २०१५ मध्ये लोकसहभागातून वनमहोत्सव भरवत १० हजाराहून अधिक देशी वृक्षांची रोपटी लावून फाशीच्या डोंगराला 'देवराई'चे रुप दिले आहे.

देवराई 'ब्लू ओकलिफ' जातीचे सुकलेल्या पानासारखे दिसणारे दुर्मीळ फुलपाखरु
देवराई 'ब्लू ओकलिफ' जातीचे सुकलेल्या पानासारखे दिसणारे दुर्मीळ फुलपाखरु

त्यावर्षात सुमारे ४० एकरावर खड्डे खोदून देशी वृक्षांची रोपटी लावण्यात आली. आज ९वर्षानंतर देवराई डोंगरावर घनदाट वृक्षवेलींचे हिरवे स्वप्न साकार झाले असून हा संपूर्ण परिसर जैवविविधेतेच समृद्ध आगार झाला आहे. दरवर्षी पर्यावरण दिन आणि इतर पर्यावरणपूरक दिनाचे औचित्य साधून येथे वनौषधी, आंबा, झुडप, वेली आदींची लागवड करून त्यांचे काटोकोर नियोजनाने संवर्धन केले जाते. संस्थेने स्वत:च्या खर्चाने दोन सुरक्षारक्षकांची नियुक्त केली आहे. हिरव्यागार वृक्षरांजी, लतावेलींनी हिरवाकंच झाला आहे. सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी, वन्यजीवांसह पक्षी, फुलपाखरे, दुर्मीळ कीटक यामुळे हा परिसर जैवविविधतेचे आगार झाला आहे. नाशिकचे तापमान यंदाच्या उन्हाळ्यात ४२ अंशावर गेले होते. मात्र, संपूर्ण उन्हाळ्यात देवराईत तापमान शहरापेक्षा ४ ते ५ अंशाने कमी होते. वृक्षवेलींनी हवेतील आर्द्रताही टिकवून ठेवल्याने यंदाच्या भीषण उष्म्यात देवराई वन्यजीवांसह पश,-पक्षांसाठी हक्काचे अधिवास झाल्याचे चित्र होते. गायकवाड यांनी नाशिकच्या देवराईचा प्रकल्प राज्यात इतरांसाठी पथदर्शी आणि अनुकरणीय ठरला आहे. त्यासाठी इतर शहरांतील पर्यावरणप्रेमी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत आहेत. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल. आज सर्वाथाने नाशिक देवराई 'ईश्वरा'चा, 'वनदेवते'चा अधिवास असलेले जंगल झाले आहे.

हिरव्या स्वप्नांतून स्वप्नपूर्तीचा प्रवास…

  • पहिल्यावर्षी (२०१५) ११ हजार वृक्षांची लागवड, पैकी ९० टक्के जगली.
  • नऊ वर्षांत २८ हजार वृक्ष-वेलींनी ७० एकरामध्ये वन क्षेत्राचा विस्तार.
  • १५ प्रजातींचे ५०० आंबा रोपे, ३० प्रजांतीचे १४०० बांबू
  • ७५ प्रजातींचे कमळ
देवराई काळी कॉकटेल मुंगीचे झाडावरील 'ट्री हाऊस'
देवराई काळी कॉकटेल मुंगीचे झाडावरील 'ट्री हाऊस'

गेल्या नऊ वर्षांत देवराईत यांचाही समावेश..

  • देशी वृक्ष : जांभुळ, तिवस, कुसूम, भोकर, कहांडळ, भोरमाळ, रेशीम धावडा, चांदवा, कृष्णवड, पारस वड, नानदृक, पायरा हे आणि असे उपयुक्त आणि जीवविविधता वाढवारे वृक्ष.
  • वेली : देवचाफा, कवंडळ, कावळी, जंगली मुसंडा, सासन, मधुनाशी, अस्थिशृंखला, बोकडवेल, झुंबरवेल यासारख्यो अनेक वेली.
  • वनौषधी : अश्वगंधा, अग्निमंत, गेळा, लोखंडी, डिकामली, पांढरा कुडा, तांबटकुडा, काळी निरगुडी, हटरुण, नेपती.
  • पक्षी : २०१५ पूर्वी एकही पक्ष्यांचा अधिवास नव्हता. आज ४०-५० भारद्वाज, १०० मोर, ससाणी, घार, शराटी, पावश्या, चष्मेवाला, तांबड, रानपिंगळा, घुबड, चकावा, बुलबुल, कोतवाल, प्लायकेचॅर (फुलटोच्या), रामगंगा (टीट), स्वर्गीय नर्तक ( पॅयराईड फ्लायकेचर), वनपिंगळा (जंगल अवलेट), कावळ्याची घरटी, घार, पावशा, तित, ब्ल्यू ओक लिफ फुलपाखरु (दुर्मीळ).
  • प्राणी : ससे, मुंगस, खारुताई, तरस, रानमांजर, उदमांजर, बिबळ्याचा अधिवास, १ जोडीचे वास्तव्य,
  • सरपटणारे जीव : घोरपड (मॉनिटर लिझार्ड) घोणस, नाग, धामण, नानेटी (कुकरी), सरडे, सापसुरळी.
  • फुलपाखऱ्या प्रजाती वाढल्या. मधमाशी पोळे, विविध प्रकारचे भुंगे, मुंग्या, मुंगळे, कीटक, भुंगे, बीटल संख्येत वाढ.

हा पर्यावरणदिन वृक्ष संवर्धनाचे वर्ष

सातपूरच्या देवराईवर जंगल फुलवणे आव्हानात्मक होते. येथे दरवर्षी देशी प्रजातींची झाडे लावून वन फुलवले. यात आमच्या संस्थेसह अनेकांचे सहकार्य आहे. मृत झालेल्या जंगलातून हिरव्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती बघताना विलक्षण समाधान, आनंद होतो. संस्थेच्या खर्चातून येथे २ सुरक्षा रक्षक नेमले. कीटक, वृक्ष वेलींसह आज पक्षी, सरपटणारे प्राणी यामुळे आज देवराई वृक्षवेलींसह समृद्ध जैवविविधेतेच केंद्र म्हणून उदयास आले आहे. 'आपलं पर्यावरण' यंदाचा पर्यावरणदिन वृक्षांची निगा, संगोपण आणि संवर्धन या संकल्पनेवर साजरा करणार आहोत. – शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण देवराईचे शिल्पकार.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news