विश्वासार्ह सरकारांमध्ये मोदी सरकार तिसऱ्या स्थानी! | पुढारी

विश्वासार्ह सरकारांमध्ये मोदी सरकार तिसऱ्या स्थानी!

दावोस : पुढारी ऑनलाईन 

मोदी सरकारवर भारतात विरोधकांनी टीकेची तिव्रता वाढवली आहे. तसेच गुजरात निवडणुकीचा निकाल मोदी सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. पण, या सर्व विरोधी वातावरणात सरकारसाठी दिलासा देणारे सर्वेक्षण झाले आहे. जागतीक विश्वासार्हता निर्देशांकानुसार जगातील पहिल्या तीन विश्वासार्ह सरकारांमध्ये मोदी सरकारचा समावेश आहे.  

जागतीक विश्वासार्हता निर्देशांकाचा अहवाल दावोसमध्ये सादर करण्यात आला. यामध्ये चीन आणि इंडोनेशियानंतर भारतातील सरकार विश्वासार्हतेच्या कसोटीत पास झाले असुन ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भारत सरकार अव्वल क्रमांकावर होते. पण, गेल्या काही महिन्यात मोदी सरकारच्या विश्वासार्हतेत तिव्रतेने घट होत चालली आहे असे आकडे सांगतात. तरी याही परिस्थितीत मोदी सरकारने जागतीक स्तरावर तिसरा क्रमांक मिळवला आहे. 

या निर्देशांकानुसार चीनने पहिला क्रमांक मिळवला आहे तर अमेरिका सरकारची विश्वासार्हता वेगाने घसरत आहे. 

Back to top button