भारत, चीनमुळे पॅरिस करारातून बाहेर : अमेरिका   | पुढारी

भारत, चीनमुळे पॅरिस करारातून बाहेर : अमेरिका  

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

पॅरिस करारातून भारत आणि चीनला फायदा होणार होता, तसेच त्याचा आमच्या देशातील उद्योग आणि रोजगाराला मोठा फटका बसणार होता, यामुळेच  या करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकीय कृती समितीसमोर स्पष्ट केले.

गतवर्षी अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. या करारातून माघार न घेतल्यास अमेरिकेला लाखो डॉलर्सचा फटका बसणार होता. अनेक रोजगार संपुष्टात येऊन तेल, गॅस, कोळसा आदी उत्पादन क्षेत्राला याचा मोठा फटका बसला असता, असे कारण त्यावेळी ट्रम्प यांनी दिले होते.

आता ते म्हणाले, या करारामुळे आम्हाला भारत आणि चीन यांना मोठी आर्थिक मदत करावी लागणार होती. आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो; अन्यथा ती मोठी शोकांतिका ठरली असती. देशासाठी तो करार घातक होता. चीन व भारत यांना पॅरिस करारातून फायदा मिळण्याची शक्यता होती. हवामान बदलाचा हा करार अमेरिकेसाठी अन्यायकारक होता, त्यामुळे अमेरिकेतील उद्योग व नोकर्‍या धोक्यात आल्या असत्या. आमच्याकडे तेल व नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आहे.

Back to top button