चीनच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे चहा’प्रेम’ | पुढारी

चीनच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींचे चहा'प्रेम'

वुहानः पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात आजच्या दुसरा दिवशी एका नदीच्या किनारी चालत-चालत वेगवेगळ्या मुद्दांवर चर्चा झाली. त्यावेळी दोघांनी चहाचा आस्वाद घेत ‘चाय पे चर्चा’ केली, त्यांनतर दोघे नावेतूनही फिरले.

यावेळी मोदींचे चहाप्रेम दिसून आले, दोघांनीही डबल कप चहा मारला. पहिला कप मोदींनी एक-एक घोट घेत संपवला, मात्र, दुसरा कप मोदींनी एका घोटातच संपवून टाकला. तर दुसरीकडे जिनपिंग यांनी मात्र, दोन्ही वेळी हळुवारपणे एक-एक घोट घेत चहा संपवला.

दरम्यान मोदी आता जिनपिंग यांच्याकडून आयोजित भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. काल मोदींनी चीनच्या भेटीवेळी ‘अशाच पद्धतीने चीन आणि भारताची अनौपचारिक भेट होत रहायला हवी’ असे वक्तव्य केले होते.

आजचा कार्यक्रम:

28 एप्रिलः  सकाळी ७ ते ७.३० पर्यंत पंतप्रधान मोदी ईस्ट लेकवर जिनपिंग यांच्या सोबत चर्चा करत फेरफटका मारतील.

८.०० ते ८.३० दरम्यान पंतप्रधान मोदी जिनपिंग यांच्यासोबत बोट ड्रायव्हिंग करतील.

९ वाजता: पंतप्रधान मोदी जिनपिंग यांच्यासोबत सकाळचे जेवण करतील.

 

Back to top button