अखेर ट्रम्प व पुतीन यांच्यामध्ये चर्चा होणार  | पुढारी

अखेर ट्रम्प व पुतीन यांच्यामध्ये चर्चा होणार 

माँस्को :  पुढारी ऑनलाईन 

गेल्या अनेक महिन्यांपासून कमालीचे संबंध ताणलेल्या अमेरिका व रशिया या दोन उभय देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चा अखेर होणार आहे. पुढील महिन्यात १६ जुलैला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात हेलसिन्कीमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांनी रशियन अधिकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर ही बहुचर्चित भेट होणार आहे. ट्रम्प यांनी या भेटीबाबत सुतोवाच केले होते. सर्वांसोबत रशिया व चीनला घेणे हे सर्वांसाठी लाभदायक असल्याचे मत त्यांनी मांडले होते. पुतीन यांच्यासोबत सिरिया, युक्रेनसह विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा होईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.

गेल्यावर्षी रशियन अधिकाऱ्यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली होती, पण त्यानंतर रशियावर अमेरिकेकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हेरगिरीचे आरोप झाल्याने दोन्ही देशांतील संबंध विकोपाला गेले आहेत. प्रस्तावित उभय देशांमधील चर्चेमुळे ताणले गेलेले संबंध काही प्रमाणात सुधारतील अशी शक्यता जागतिक पटलावरून व्यक्त होत आहे. 

 

Back to top button